गुन्हे विषयक
उधारी मागीतल्याच्या कारणावरून एकास मारहाण
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीतील कापड दुकानाच्या समोरून जात असताना आरोपी दुकानदार नारायण जगन गाडेकर याने फिर्यादिस हाक मारून त्याच्याकडून उसने पैसे मागितल्याचा राग येऊन आरोपीने आपल्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आपल्या नाकावर बुक्का मारून आपल्याला गंभीर जखमी केल्याचा गुन्हा शिवदास शेकू ठाकरे (वय-५३) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे,त्यामुळे वारी परिसरात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी शिवदास ठाकरे व आरोपी दुकानदार नारायण गाडेकर हे एकाच गावचे असून त्यांची ओळख-पाळख आहे.यातील आरोपी दुकानदार याचे कापडाचे दुकान आहे.फिर्यादी शिवदास ठाकरे हे या दुकानासमोरून दि.१० ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जात असताना आरोपी नारायण गाडेकर याने श्रद्धा रेडिमेड कापडाचे दुकानासमोर फिर्यादी शिवदास ठाकरे हे जात असताना आरोपीने त्यास हाक मारून बोलावून घेतले व उसने पैसे मागीतल्याच्या कारणावरून फिर्यादिस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आपल्या नाकावर बुक्का मारून आपल्याला गंभीर जखमी केल्याचा गुन्हा शिवदास शेकू ठाकरे (वय-५३) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे,त्यामुळे वारी परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी शिवदास शेखू ठाकरे यांनी गुहा दाखल केला आहे.मारहाणीनंतर आरोपी फरार झाला आहे.पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५३६/२०२० भा.द.वि.कलम ३२५,३२३,५०४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.