गुन्हे विषयक
कोपरगावातून दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील विवेकानंदनगर येथील रहिवाशी असलेले व राहुरी विद्यापीठाच्या सावळीविहिर येथील संशोधक केंद्रातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी सुभाष सदाशिव जोशी (वय-६१) यांच्या घरासमोर उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स (क्रं.एम.एच.१७ बी.एफ.२१७४) हि दि.१० ऑक्टोबर रोजी रात्री घरासमोर उभी करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्याने अज्ञात कारणासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने दुचाकीस्वारात खळबळ उडाली आहे.
सुभाष जोशी यांच्या मालकीची २०१५ साली खरेदी केलेली हिरो कंपनींची वरील क्रमांकाची सुमारे २० हजार रुपये किमतीची दुचाकी होती.ते नेहमी आपल्या विवेकानंदनगर येथील घरासमोर उभी करून ठेवत असत.मात्र गत १० ऑक्टोबरच्या रात्री नेहमी प्रमाणे त्यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी करून ठेवली असता व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहिले असता ती गायब झालेली आढळली आहे.
फिर्यादी सुभाष जोशी हे राहुरी विद्यापीठाच्या सावळीविहिर येथील संशोधन केंद्रात नोकरीस होते.मात्र ते काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या मालकीची २०१५ साली खरेदी केलेली हिरो कंपनींची वरील क्रमांकाची सुमारे २० हजार रुपये किमतीची दुचाकी होती.ते नेहमी आपल्या विवेकानंदनगर येथील घरासमोर उभी करून ठेवत असत.मात्र गत १० ऑक्टोबरच्या रात्री नेहमी प्रमाणे त्यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी करून ठेवली असता व दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहिले असता ती गायब झालेली आढळली आहे.त्यांनी ती आजूबाजूला शोध घेऊन पहिली असता त्यांना मिळून आली नाही.त्यांनी अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गु.र.क्रं.८०३/२०२० भा.द.वि.कलम ३७९ प्रमाने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.