कोपरगाव तालुका
परतीच्या पावसाचे नुकसान भरपाई मिळवून देऊ-आश्वासन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील दोन दिवसात परतीच्या पावसाने मागास सोयाबीन,बाजरी,मका व कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच दिले आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघात रविवार दुपारी व मध्यरात्री नंतर झालेल्या मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या मागास सोयाबीन,बाजरी,मका तसेच कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आज पाहणी केली असता हे आश्वासन दिले आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची कोट्यावधींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वेळोवेळी जमा करण्यात आली आहे.चालूवर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड असून या पावसाने सर्व विक्रम मोडले आहे.वैश्विक कोरोना संकट,काही महिन्यापूर्वी आलेले चक्रीवादळ आदी संकटांचा महाविकास आघाडी सरकारने यशस्वी मुकाबला केला आहे-आ.काळे
कोपरगाव विधानसभा मतदार संघात रविवार दुपारी व मध्यरात्री नंतर झालेल्या मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या मागास सोयाबीन,बाजरी,मका तसेच कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आज पाहणी केली असता हे आश्वासन दिले आहे.
यावेळी ते म्हणाले की,”राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे.सरकार जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारने आजवर शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहे.त्यामुळे मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची कोट्यावधींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वेळोवेळी जमा करण्यात आली आहे.चालूवर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड असून या पावसाने सर्व विक्रम मोडले आहे.वैश्विक कोरोना संकट,काही महिन्यापूर्वी आलेले चक्रीवादळ आदी संकटांचा महाविकास आघाडी सरकारने यशस्वी मुकाबला केला आहे.शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला माल घरात येण्यापुर्वीच निसर्गनिर्मित संकटाने शेतकऱ्यांच्या होता-तोंडातील घास हिरावला आहे.मागील दोन दिवसांपूर्वी येवू घातलेल्या चक्रीवादळातून आपला जिल्हा थोडक्यात बचावला त्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी नुकसान झालेच असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण निश्चितपणे शासनदरबारी प्रयत्न करू असे आश्वासनही आ.काळे यांनी शेवटी दिले आहे.
याप्रसंगी सभापती पोर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक हरिभाऊ शिंदे,जिनिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,विष्णू शिंदे,नितीन शिंदे,अनिल दवंगे,सुनील गिरमे,प्रदीप बंब,ज्ञानदेव दवंगे,सुनील दवंगे,सुहास दवंगे,काकासाहेब शिंदे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.