नगर जिल्हा
वाकडीनजीक या..रस्त्याची लागली वाट !
जनशक्ती न्यूजसेवा
वाकडी-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिंदे आहेर वस्ती,लांडेवाडी मार्गे असणाऱ्या नांदूर खंडाळा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या भागात शिंदे आहेर वस्ती पुढील रस्ता अत्यंत चिखलात व अतिक्रमण झाडात सापडला असून या रस्त्यावरून ये जा करताना अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे या रास्त्याचे काम तातडीने करावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
वर्तमानात पावसाळा सुरस असून परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेच पण साऱ्यां रस्त्यांची वाट लागली आहे.याच रस्त्यावरून पुढे लांडेवाडी कडे जात असताना हनुमानवाडी लगत हा रस्ता अत्यंत चिखल गाळयुक्त झाला आहे.त्यामुळे हा रास्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वर्तमानात पावसाळा सुरस असून परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेच पण साऱ्यां रस्त्यांची वाट लागली आहे.याच रस्त्यावरून पुढे लांडेवाडी कडे जात असताना हनुमानवाडी लगत हा रस्ता अत्यंत चिखल गाळयुक्त झाला आहे.या भागात रस्त्याची उंची वाढविणे गरजेचे आहे.आज या भागातून प्रवास करणे फार कठीण झाले आहे. हा रस्ता वाकडी मार्गे नांदूर,खंडाळा,उक्कलगाव,रांजणखोल या गावांना जोडणारा असून या भागातून दळणवळणासह अनेकांची ये जा सुरु असते.तरी या चिखल व गाळयुक्त रस्त्याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.