शैक्षणिक
..या गावात कर्मवीर जयंती उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
सावळीविहीर-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साध्या पद्धतीने पण उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना करून आज तिचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.आशिया खंडात सर्वात मोठी शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्था समजली जाते.अशा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांना शिक्षण मिळावे.सर्वसामान्य व तळागळातील कुटुंबातील मुलांना शिक्षित होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले-बाळासाहेब जपे,माजी सरपंच
सावळीविहीर बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये नुकतेच सकाळी श्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.पुष्पहार व पुष्पगुच्छ वाहण्यात आले.सध्या कोरोणाचा काळ सुरू असल्यामुळे हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घेण्यात आला.दरवर्षी येथे कर्मवीर जयंती निमित्त या शाळेतील विद्यार्थ्यी कर्मवीर आंण्णाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातुन काढली जात असते. तसेच शाळेतही विविध कार्यक्रम घेण्यात येतात.जयंती निमित्त दरवर्षी विविध स्पर्धाही घेण्यात येत असतात.मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहे.विद्यार्थी नाहीत.मिरवणुकीला परवानगी नाही.त्यामुळे हा कार्यक्रम शाळेत गर्दी न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घेण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1987 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला होता. आज त्यांची १३३ वी पुण्यतिथी आहे.भारत सरकारने त्यांना १९५९ साली पद्मभूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.कर्मवीर अण्णांचे महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातही मोठे कार्य आहे.त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना करून आज तिचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे.आशिया खंडात सर्वात मोठी शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्था समजली जाते.अशा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांना शिक्षण मिळावे.सर्वसामान्य व तळागळातील कुटुंबातील मुलांना शिक्षित होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले.त्यांनी कमवा व शिका योजना आणली.अशा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सावळीविहीर बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज मंगळवारी पुष्पहार व पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे व्यवस्थापक कमिटीचे बाळासाहेब जनार्धन जपे,विकास जपे,सुनील रामनाथ जपे,सोनवणे,जपे,शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर,आदी उपस्थित होते.