कोपरगाव तालुका
अण्णाभाऊंनी उपेक्षितांचे प्रश्नांना न्याय दिला-स्मरण
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकशाहीर अण्णाभाऊं साठे यांनी आपल्या जीवनात दु:ख दारिद्र जवळून पाहिलेले असल्याने त्यांनी उपेक्षितांचे प्रश्नांला त्यांच्या लेखनातून वाचा फोडली असे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा ऐश्वर्या सातभाई यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
अण्णाभाऊंनी गिरणी कामगारांचे प्रश्न आणि सयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीतून समाजापूढे आणली त्यांनी लिहिलेल्या साहित्यातून मला हि प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे मला नगराध्यक्षाचे कारकीर्दीत अपेक्षित घटकांचे प्रश्न सोडविता आले-ऐश्वर्या सातभाई
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी सोहळा संपन्न होत आहे.त्या निमीत्त कोपरगाव येथे त्यांच्या व्याख्यानमालेचे जिल्हा लहुजी सेना व दलित साहित्य संमेलन कोपरगाव शाखा यांच्या वतीने नुकतेच आयोजन करण्यात आले होते त्या वेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई अॅङ सुरेश मोकळ,दिनेश आरणे,दतु खैरणार आदि मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी उदघाटन करताना त्या पूढे म्हणाल्या की,”अण्णाभाऊंनी गिरणी कामगारांचे प्रश्न आणि सयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीतून समाजापूढे आणली त्यांनी लिहिलेल्या साहित्यातून मला हि प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे मला नगराध्यक्षाचे कारकीर्दीत अपेक्षित घटकांचे प्रश्न सोडविता आले.तसेच अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळ्या संदर्भात शक्य तेवढे काम करतां आले.त्या शिवाय जेव्हा जेव्हा कोपरगांवला दलित साहित्य संमेलन झाले त्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष व कवि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अण्णाभाऊ व लहुजी साळवे यांचे जीवनावर बोलण्याच्या योग आला त्या मुळे आपले जीवन धन्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे व आयोजन कमेटीला धन्यवाद देवून पुढील साहित्य प्रवासास शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहूण्यांचा परिचय व प्रस्ताविक बाळासाहेब नेटके यांनी केले नंतर प्रतिमेस पुष्पहार घालून उदघाटन झाले आभार परशुराम साळवे यांनी मानले.