कोपरगाव तालुका
बहादरपूर नजीक अपघात,एक ठार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेले सुरेश परशराम पाडेकर (वय-४५) हे सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास दूध घालण्यासाठी जवळके येथे सायकलवरून जात असताना धोंडेवाडी समोरून येणाऱ्या व वावीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंडाई क्रेटा (क्रं.एम.एच.१७ बी.एक्स.७२११) या कारने जोराची धडक दिल्याने सायकल चालक जागीच ठार झाले आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.त्यांच्या पच्छात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.धडक देणारी कार हि साकुरी येथील असल्याचे समजते.
अपघातानंतर कार चालक फरार झाला होता.मात्र कोपरगाव पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी सावधगिरी राखत अंजनापूर मार्गे रांजणगाव देशमुखच्या दिशेने भरधाव वेगाने पळून जाणाऱ्या कार चालकाला नजीकच्या ग्रामस्थांना सावध करून हि कार पकडून दिली आहे.हि कार अक्षय दीपक रोहोम यांची असल्याचे समजते.या घटने नंतर मयत सुरेश पाडेकर यांच्यावर उपचारार्थ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.