जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संवत्सर शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह,परिसरात खळबळ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महानुभाव आश्रमानजीक असलेल्या स्मशानभूमी जवळ गोदावरी नदी पात्रात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत (वय अंदाजे पस्तीस वर्ष असलेले) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत गोदावरी नदी पात्रात एक पुरुष जातीचे प्रेत पाण्यात तरंगत असल्याची माहिती अमोल मारुतराव आचारी यांनी संवत्सर येथील पोलीस पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी लागलीच हि खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास कळविली. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन रवाना झाले त्यांनी स्थानिक नागरिकांना मदतीस घेऊन हे प्रेत पाण्याबाहेर काढले असता या प्रेताची पाण्यातील जलचारांनी बरीच दुरावस्था केलेली आढळली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत गोदावरी नदी पात्रात एक पुरुष जातीचे प्रेत पाण्यात तरंगत असल्याची माहिती अमोल मारुतराव आचारी यांनी संवत्सर येथील पोलीस पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी लागलीच हि खबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास कळविली. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन रवाना झाले त्यांनी स्थानिक नागरिकांना मदतीस घेऊन हे प्रेत पाण्याबाहेर काढले असता या प्रेताची पाण्यातील जलचारांनी बरीच दुरावस्था केलेली आढळली आहे.चेहरा व शरीराचा काही भाग कुर्तडलेला होता.शहर पोलिसानी या जागीच स्थळ पंचनामा करून या प्रेताची रवानगी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात केली आहे.घटनास्थळी पोलीस पाटील लीना आचारी,बंडू आचारी,भारत साबळे,मोहन सोनवणे, नारायण निरगुडे, बाळू गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.मयताच्या अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट,विटकरी रंगाची रात्र विजार असा वेष असून हि व्यक्ती धष्टपुष्ट दिसत आहे.या व्यक्तीने आत्महत्या केली आहे की अन्य कोणी त्याची हत्या केली हे आज तरी स्पष्ट होत नसून या इसमाच्या मृत्यूचे कारण व ओळख शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची र.नोंद २३/२०२० अन्वये आपल्या दप्तरी केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक ए. बी.दारकुंडे हे करीत आहेत.या घटनेने संवत्सर परिसरात तर्क-कुटार्कांना उधाण आले आहे.हे शव गोदावरी पात्रात नुकत्याच आलेल्या पुरच्या पाण्यात वाहून आले असावे व ताई नदीच्या वरील गावातून आले असावे असा संशय व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close