जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावातील अंगणवाडी सेविकेकडून मुख्यमंत्री निधीस ११ हजार!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेधारणगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील रहिवासी सावित्रीबाई निकम यांनी कोरोनाग्रस्तांचा मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ हजार रुपयांची मदत दिली असुन या रक्कमेचा धनादेश कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांचे स्वाधिन केला आहे.त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
कोपरगाव तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक नागरीकांनी स्वच्छेने तसेच आपल्या परीने मदत केली असुन तालुक्यातील ग्रामिण भागही या कामी मागे नाही.असे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

सावित्रीबाई फुले यांचा आदेश डोळ्यासमोर ठेवुन सावित्रीबाई निकम यांनी २१ जून १९८८ रोजी धारणगाव येथील खंडोबा मंदीरात स्वखर्चाने पहीली अंगणवाडी सुुरू केली होती. पुढील पाचवर्ष त्यांनी हि सेवा विनामोबदला सुरु ठेवली पुढे १९९३ मध्ये शासनाकडुन त्यांना ३०० रुपये मानधन सुरू झाले.अशा बिकट परीस्थितीत हि त्यांनी आपले कार्य गावात सतत सुरू ठेवले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत महीला व बालकल्याण विभाग अहमदनगर यांनी २०१८-१९ चा आर्दश अंगणवाडी सेविका या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील रहिवासी व महीला व बालकल्याण विभागाचा जिल्हास्तरीय आर्दश अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त झालेल्या सावित्रीबाई छगन निकम यांनी २ मे रोजी असलेला आपला वाढदिवस साजरा न करता ती रक्कम कोविड १९ मुख्यमंत्री सहय्यता निधीस दिली आहे. सदर रकमेचा धनादेश तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या स्वाधीन केला आहे. या कार्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी दुरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले आहे.
सावित्रीबाई निकम याच महीन्यात सेवानिवृत्त होणार असुन सेवानिवृत्तीचा समारंभ न करता तसेच वाढदिवस साजरा न करता ती रक्कम कोरोग्रस्तासाठी मदत म्हणुन दिली आहे. यांच्या कार्या बद्दल कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,तालुका कृषी अधिकारी जे.डी.वाघेरे,सरपंच नानासाहेब चौधरी,तलाठी धनंजय पठाडे तसेच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी,धारणगाव ग्रामस्थ तसेच परीसरातील नागरीकांनी अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close