कोपरगाव तालुका
करंजी येथील शाळेच्या खोल्याचे भूमिपूजन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत १२ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदे कडून मंजूर करून व करंजी ग्रामपंचायत च्या १४ व्या वित्त आयोगातुन ५ लाख रुपये निधीची ग्रामपंचायती कडून तरदूत करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना संचालक संजय आगवन यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
या वेळी संजीवनी साखर कारखाना संचालक भास्कर भिंगारे,करंजीचे सरपंच छबुनाना आहेर,उपसरपंच रवींद्र आगवन,विजय कापसे,मुख्याध्यापक श्री वाघ सर, व काही मोजकेच स्थानिक वस्तीवरील ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी प्रशासनाचे सुरक्षित अंतराचे नियमाचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्यां विमलताई आगवन व करंजी ग्रामपंचायतीचे धन्यवाद मानले.