कोपरगाव तालुका
संग्राम जगताप यांच्या विजयासाठी किसान काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार
सुपा येथे नियोजन बैठक संपन्न
सुपा (प्रतिनिधी )-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.संग्राम जगताप यांच्या निवडणूक प्रचारार्थ नियोजन बैठकीचे आयोजन सुपा येथे करण्यात आले होते. काँग्रेस नेते तथा किसान कॉंग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा श्री प्रसाद खामकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक सम्पन्न झाली. या बैठकीला किसान कॉंग्रेसचे नगर जिल्हा अध्यक्ष मा श्री रमेश महाराज दळवी यांचेसह शेतकरी नेते विनोद शिंदे , महेश शिंदे ,आदी लोकांनी मार्गदर्शन केले. या नियोजन बैठकीला पारनेर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तथा आघाडीचे मान्यवर नेते व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या नियोजन बैठकीच्या आयोजनासाठी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. काँग्रेस अध्यक्ष मा.राहुलजी गांधी यांच्या आदेशानुसार पक्षाची धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचवून नगर दक्षिण चे उमेदवार मा संग्राम जगताप यांच्या विजयासाठी एकजुटीने अथक प्रयत्न करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.