जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आठवड्यातील पाच दिवस दुकाने सुरु ठेवा-मागणी

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात व तालुक्यात आता एकही रुग्ण नसल्याने तालुका प्रशासनाने आता दररोज वेगवेगळ्या व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची संधी देऊन शहरात गर्दी होत असल्याने आता आठवड्यात पाच दिवस सर्वच दुकाने उघडण्यास संधी द्यावी त्यामुळे होणारी गर्दी टाळता येईल अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे केली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

आठवड्यातील सहा दिवस टप्प्या टप्प्याने व्यवहार सुरू ठेवल्याने सहाही दिवस संपुर्ण शहरात सर्व रस्त्यावर,दुकानांत सुरक्षित अंतराचे पालन होताना दिसत नाही.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे.शासकिय सूचनेनुसार,परिस्थिती नुसार आपण त्यात बदलही करता येऊ शकतो.मेडिकल स्टोअरलाही मात्र या नियमाचा अपवाद करावा लागेल-अध्यक्ष वहाडणे

कोपरगावात १० एप्रिल नंतर अद्याप एकही रुग्ण आढळला नाही.त्यांनतर आता तालुका प्रशासनाने सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत विशिष्ट दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र या दिवशी शहरात जास्त गर्दी होताना दिसत आहे.परिणामस्वरूप नागरिक व व्यापारी यांची अवस्था अडचणींची ठरू शकते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर पाळणे या दोन्ही घटकांना पाळणे अवघड होऊन त्याचे खापर पुन्हा व्यापाऱ्यांवर येऊन नको ते संकट पुन्हा निर्माण होऊ नये या साठी तालुका प्रशासनाने शनिवार व रविवार हे दोन दिवस सोडून बाकी पाच वारी व्यापाऱ्यांना आपली दुकाने सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत उघडण्यास परवानगी द्यावी.नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन केले तर लहान मोठे व्यवसाय सुरू होऊन सर्वांनाच दिलासा मिळणार आहे.

यासाठी पालिकेने नियोजन केले.मात्र आठवड्यातील सहा दिवस टप्प्या टप्प्याने व्यवहार सुरू ठेवल्याने सहाही दिवस संपुर्ण शहरात सर्व रस्त्यावर,दुकानांत सुरक्षित अंतराचे पालन होताना दिसत नाही.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे.शासकिय सूचनेनुसार,परिस्थिती नुसार आपण त्यात बदलही करता येऊ शकतो.मेडिकल स्टोअरलाही नियम लावणे आवश्यक आहे.कारण औषध घ्यायचे या नावाखाली अनेकजण शहरात भरकटत असतात.शनिवार आणि रविवार या सलग दोन दिवशी टाळेबंदी यशस्वी करता येईल.इलेक्ट्रिक मोटार,मोटारसायकल आदी दुरूस्तीसाठी येणाऱ्या सर्वांची फारच कुचंबणा होते.एक दिवसांत काम झाले नाहीतर खेड्यातून पुन्हापुन्हा कोपरगाव शहरात यावे लागते,अशा प्रकारच्या अनेक अडचणी येतात त्या दूर करणे सहज शक्य होईल असा आशावादही अध्यक्ष वहाडणे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close