कोपरगाव तालुका
..या गावात आ. काळे यांनी घेतली आढावा बैठक
संपादक-नानासाहेब जवरे
धारणगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक पातळीवर होत असलेल्या उपाययोजनांची माहीती घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच आढावा बैठक घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.त्या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव शेजारील येवला तालुक्यात कोरोनाने धुमाकुळ घातला असुन आज नव्याने ६ कोराना बाधितांची नोंद झाली असुन एुकुण संख्या आता ३१ झाली आहे. कोपरगावकरांसाठी हि धोक्याची घंटा असुन या घटनेच गांभिर्य लक्षात घेउन प्रशासनाकडुन नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे त्याचे पालन करणे गरजेचे-आ. काळे.
या बैठकीत आ. काळे यांनी मागील दोन महीन्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने स्थानिक पातळीवर केलेल्या कामाची माहीती घेतली. तसेच गावातील नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याबाबतच्या महत्वाच्या सुचना आ. काळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी दिल्या.
कोपरगाव शेजारील येवला तालुक्यात कोरोनाने धुमाकुळ घातला असुन आज नव्याने ६ कोराना बाधितांची नोंद झाली असुन एुकुण संख्या आता ३१ झाली आहे. कोपरगावकरांसाठी हि धोक्याची घंटा असुन या घटनेच गांभिर्य लक्षात घेउन प्रशासनाकडुन नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.याबाबतीत गावातीला दक्षता समितीने सतर्क राहुन उपाययोजना कराव्या तसेच बाहेरून गावात येणाऱ्याची आरोग्य तपासणी करूनच गावात प्रवेश द्यावा रेशन वाट्पाच्या वेळी सुरक्षित अंतराचे पालन होइल याची काळजी घेण्या बरोबरच नागरीकांनी संकटकाळात शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन या वेळी केले.
या प्रसंगी संरपंच नानासाहेब चौधरी, उपसरपंच गोरख चौधरी,गौतम बॅकचे संचालक साहेबलाल शेख,यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,पोलिस पाटील, रेशन दुकानदार पहाडे, ग्रामसेविका पुनम आहिरे आरोग्य सेवक डॉ.राजेंद्र खरे, डॉ पाटिल, रावसाहेब चौधरी, ग्रा.पं कर्मचारी नानासो चौधरी यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.