कोपरगाव तालुका
कांदे टाकण्याच्या कारणावरून मारहाण,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत शेड मध्ये कांदे टाकु नका असे म्हटल्याचा राग येऊन आरोपी बाप एकनाथ काशिनाथ,आई शकुंतला एकनाथ शिंगाडे,भाऊ बाबासाहेब एकनाथ शिंगाडे, सुनंदा दीपक गंगावणे सर्व रा. शिंगणापूर यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर एकनाथ शिंदें यास गज आणि काठीने मारहाण करून ज्ञानेश्वर शिंगाडे व त्यांची पत्नी सुरेखा उर्फ लता शिंगाडे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी ज्ञानेश्वर शिंगाडे व त्याचे वडील एकनाथ शिंगाडे हे जवळजवळ राहतात.त्यांचे कांद्याचे एक शेड असून या शेडमध्ये कांदे टाकण्याच्या कारणावरून त्यांच्यात बऱ्याच दिवसाची धुसफूस सुरु होती.दि.८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच्यात या कारणावरून बेबनाव तयार होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आहे.
ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी ज्ञानेश्वर शिंगाडे व त्याचे वडील एकनाथ शिंगाडे हे जवळजवळ राहतात.त्यांचे कांद्याचे एक शेड असून या शेडमध्ये कांदे टाकण्याच्या कारणावरून त्यांच्यात बऱ्याच दिवसाची धुसफूस सुरु होती.दि.८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच्यात या कारणावरून बेबनाव तयार होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपी बाप एकनाथ काशिनाथ,आई शकुंतला एकनाथ शिंगाडे,भाऊ बाबासाहेब एकनाथ शिंगाडे, सुनंदा दीपक गंगावणे सर्व रा. शिंगणापूर यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर एकनाथ शिंदें यास गज आणि काठीने मारहाण करून ज्ञानेश्वर शिंगाडे व त्यांची पत्नी सुरेखा उर्फ लता शिंगाडे हे दोघे जण गंभीर जखमी केले आहे.फिर्यादी ज्ञानेश्वर शिंगाडे यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वरील चारही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. टी. बच्छे हे करीत आहेत.