कोपरगाव तालुका
जवळा परिसरातील ग्रामस्थांचा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा…!!
कुकडीचे पाणी पेटले,,? संघर्ष अटळ , सत्ता असूनही पाणी नाही,,शेतकऱ्यांमधून संताप
कुकडी कालवा लाभ क्षेत्रातील जवळा ता पारनेर परिसरातील गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊन साध्याच्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे , तीव्र उन्हाचे चटके बसून चारा पिकेही जळून गेली आहेत कुकडी प्रकल्पात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही केवळ योग्य नियोजना अभावी स्वतः च्या पोळीवर तूप वाढून घेण्यापायी ही वेळ आल्याने कुकडी प्रशासनाविरोधात व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या कार्य पध्दती वर तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्या निषेधार्थ व कुकडी कालव्याला १ एप्रिल च्या आत पाणी न सोडल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समस्त जवळा व परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे
यावेळी कुकडी प्रकल्प अंतर्गत धरणात ८५% पाणी साठा शिल्लक असताना म्हणजे २७ टी, एम, सी , इतके पाणी होते पैकी कुकडी कालव्यातून अद्याप पर्यंत फक्त एकदाच आवर्तन सोडण्यात आले त्यानंतर सुमारे शंभर दिवस उलटूनही कालव्यातून पाणी नाही उलट प्रशासनाचे अजूनही ‘चल पुढच्या नाळीत ‘चालूच आहे मग नागरच्या हक्काचे पाणी गेले कुठे ? संपुर्ण पुणे जिल्हा’ ओला’ झाला अन कुकडी डावा कालवाच कसा काय कोरडा राहिला ? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे बाकी पाणी कुणी पळवले ? पुण्याच्या सगळ्या राजकीय दादा ना नगरचे राजकीय ,, ‘सर’, अन, पारनेरचे राजकीय ‘राव’ घाबरतात की काय ? त्यामुळेच आपल्या हक्काचे पाणी आपण सत्ता असताना ही पण मिळवू शकत नाही ही पारनेर व नगरची फार मोठी शोकांतिका च म्हणावी लागेल, की शेतकऱ्यांचा बळी देऊन राजकीय तडजोडी करून पोळी भाजण्याचे काम सुरू आहे हे सर्व सामन्यांना पडलेले एक कोडेच म्हणावे लागे