कामगार जगत
…यांनी सेवानिवृत साखर कामगारांची रक्कम मिळवून दिली!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
गणेश सहकारी साखर कारखाना सेवानिवृत्त कर्मचारी यांचे १ कोटी ५७ लाख थकीत वेतन मिळवून दिल्याबद्दल कामगारांच्या वतीने शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचा कर्मचारी संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला आहे.

दरम्यान यापूर्वीही सन 2018 – 2019 साली सेवानिवृत कामगार संचालक रमेश देशमुख यांचे काळात सेवानिवृत कामगाराचे थकीत वेतन काढण्यासाठी उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठात ॲड.अजित काळे यांनी एक याचिका दाखल करून त्यांना थकीत वेतन मिळवून दिले होते.त्याबाबत गणेश सहकारी साखर कारखान्याचे कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.
गणेश साहकारी साखर कारखानाचे सेवानिवृत कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन थकले होते.त्यांनी अनेकवेळा त्याबाबत कारखाना प्रशासनाशी पत्रव्यवहार करून उपयोग झाला नव्हता.अखेर कामगारांनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्याशी संपर्क साधून याबाबत विधी सहाय्य मागितले होते.त्याबाबत त्यांना सर्व विषय अवगत केला होता.त्यानंतर ॲड.काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे थकीत वेतन एक कोटी ५७ लाख रुपये मिळवून दिले असल्याची माहिती हाती आली आहे.

गणेश कारखाना सेवानिवृत्त कर्मचारी यांचे एक कोटी ५७ लाख थकीत वेतन मिळवून दिल्याबद्दल शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांच्यासह,जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके, सचिव रूपेंद्र काले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कार्लस साठे,संपर्कप्रमुख साहेबराव चोरमल,युवा तालुकाध्यक्ष शरद आसने,खिर्डीचे सरपंच प्रभाकर कांबळे,सतीश नाईक,ॲड.प्रशांत कापसे,संदीप उघडे,अरविंद साळवे,भाऊसाहेब गव्हाणे,सोपान नाईक,गणेश कारखान्याचे निवृत्त कर्मचारी बाबुराव जाधव,दिपक धनवटे,विठ्ठलराव घुले,बाळासाहेब पवार,दिलीप चौधरी,गणेश आग्रे, ज्ञानेश्वर धनवटे,सुनील डोखे,नानासाहेब बोर्डे,अमोल झीने,वेनुनाथ शेळके,साहेबराव फंड,ज्ञानेश्वर बडाख,अजित बडाख,सुनील लोहकरे,रमेश देशमुख यांच्यासह गणेश साखर कारखाना निवृत्त कर्मचारी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान यापूर्वीही कामगार संचालक रमेश देशमुख यांचे काळात सेवानिवृत कामगाराचे थकीत वेतन काढण्यासाठी उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठात ॲड.अजित काळे यांनी एक याचिका दाखल करून त्यांना थकीत वेतन मिळवून दिले होते.त्याबाबत गणेश सहकारी साखर कारखान्याचे कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.



