विधी व न्याय विभाग
काकडी तिहेरी हत्याकांड,खटला जलद न्यायालयात चालवा-…या संस्थेची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
“कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायत हद्दीतील विमानतळाच्या दक्षिण बाजूस भोसले वस्तीवर दि.०५ एप्रिल २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास काही चोरट्यांनी वस्तीवर पाळत ठेवून घरावर सशस्त्र हल्ला केला होता.त्यात साहेबराव भोसले व त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले,पत्नी साखरबाई भोसले आदींची निर्घुण हत्या झाली होती.या तिहेरी हत्याकांडाला दिड वर्षे उलटले असून या खटला राज्य सरकारने विशेष सरकारी वकील नेमून तातडीने आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांचेसह काकडी,जवळके,धोंडेवाडी,अंजनापूर,बहादरपुर,वेस-सोयगाव,बहादराबाद,शहापूर,कासारे,सायाळे आदी ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामसभाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे नुकतीच केली आहे.

“काकडी ग्रामपंचायत हद्दीतील विमानतळाच्या दक्षिण बाजूस भोसले वस्तीवर दि.०५ एप्रिल २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास काही चोरट्यांनी वस्तीवर पाळत ठेवून घरावर सशस्त्र हल्ला केला होता.त्यात साहेबराव भोसले व त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले हे जागीच ठार झाले होते,तर त्यांची पत्नी साखरबाई भोसले हिचे उपचार सुरू असताना निधन झाले होते.या प्रकरणाची सुनावणी जलद न्यायालयात करून आरोपींना कठोर शासन करावे”- बाळासाहेब दहे,मयत साहेबराव भोसले यांचे भाचे,संवत्सर,तालुका कोपरगाव.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायत हद्दीतील विमानतळाच्या दक्षिण बाजूस भोसले वस्तीवर दि.०५एप्रिल २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास काही चोरट्यांनी वस्तीवर पाळत ठेवून घरावर सशस्त्र हल्ला केला होता.त्यात साहेबराव भोसले व त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले हे जागीच ठार झाले होते,तर त्यांची पत्नी साखरबाई भोसले हिचे उपचार सुरू असताना निधन झाले होते.या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने कोपरगाव तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.यात आरोपी हे मुरघास बनविणारे कामगार होते.राहाता पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावून दोन आरोपींना अटक केली होती.तांत्रिक विश्लेषण,सीसीटीव्ही फूटेज आणि मोबाईल ट्रॅकिंगचा वापर करत आरोपींचा शोध करून त्यानंतर आरोपी सिन्नर मार्गे नाशिककडं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार सापळा रचत पळशी टोलनाक्यावरुन आरोपी संदीप दहाबाड आणि जगन किरकिरे (तेलिंबरपाडा,तालुका-मोखाडा,जिल्हा-पालघर) यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.त्यानंतर तपासादरम्यान आरोपी संदीपनं गुन्ह्याची कबुली दिली होती.मात्र अद्याप दिड वर्षे उलटूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही.त्यामुळे काकडी आणि परिसरात ग्रामस्थांत संताप खदखदत आहे.त्याला वाचा फोडण्याचे काम जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेने केले असून नजिकच्या ग्रामपंचायतीना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करून ग्रामसभा घेऊन सदर खटला विशेष सरकारी वकील नेमून जलद न्यायालयात चालवावा अशी मागणी केली होती.त्याला ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला असून त्यात काकडी,जवळके,धोंडेवाडी,अंजनापूर,बहादरपुर,वेस-सोयगाव,बहादराबाद,शहापूर,कासारे,सायाळे आदी ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामसभाद्वारे ही मागणी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री तथा राज्याचे विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात जनमंगल ग्रामविकास संस्थेने म्हटले आहे की,”या घटनेतील आरोपीचा खटला हा राज्याच्या विधी व न्याय खात्याने आणि त्या खात्याचे मंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील नेमून जलद न्यायालयात दाखल करावा व सहा महिन्यात निकाली काढावा व आरोपींना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून असा गुन्हा करण्यास कोणी धजाऊ नये असा ठराव वरील ग्रामपंचायतींनी एकमताने मंजूर केला आहे.सदरचा ठराव राज्याचे मुख्यमंत्री यांचेसह जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे,खा.भाऊसाहेब वाकचौरे,प्रधान सचिव विधी व न्याय खाते,जिल्हाधिकारी अहिल्यानगर आदींना निवेदनाच्या प्रति दिल्या आहेत.आता विधी व न्याय खाते काय भूमिका घेणार याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिले आहे.



