जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडेच्या लाभक्षेत्रात चार आवर्तन द्या -कालवा समितीची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    राज्यासह नगर-नाशिक जिल्ह्यात वर्तमानात दुष्काळाने ठाण मांडले असून त्यासाठी उत्तर नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे पाणी उजव्या डाव्या कालव्या मार्फत पाण्यासाठी भूजल पातळी वाढविण्यासह शेती पूरक व्यवसाय टिकविण्यासाठी व जनावरांना चारा निर्माण करण्यासाठी चार आवर्तनाद्वारे देण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले,कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे आदींनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

“यावर्षी तर जवळपास दुष्काळच जाहीर झाला आहे.त्यामुळे निळवंडे उजव्या डाव्या कालव्याचे आवर्तन सोडणे गरजेचे आहे.नाही तर दुग्ध,कुक्कुटपालन तत्सम शेती पुरक व्यवसाय अडचणीत येतील.चारा पिके शिल्लक राहणार नाही.जमिनीची भूजल पातळी खोलवर गेलेली आहे.निळवंडे लाभक्षेत्राचे 182 गावांचे हद्दीत नदीवर असलेल्या पाझर तलाव व के.टी.वेअर भरून द्यावे.उजव्या व डाव्या कालव्याचे पाणी मिळाले नाही तर जनावरांना चारा,ग्रामस्थांना पिण्याचे पाणी शिल्लक राहणार नाही.त्यामुळे डाव्या आणि उजव्या कालव्याला चाचणीपूर्व किमान चार आवर्तन सोडण्यात यावे.या मागणीची कालवा सल्लागार समितीत गांभीर्याने दखल घेण्यात यावी”-भाऊसाहेब शिंदे,ज्येष्ठ कार्यकर्ते,निळवंडे कालवा कृती समिती,नगर-नाशिक.


        राज्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाने ठाण मांडल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे राज्य सरकारने उपाय उयपोजना जाहीर केल्या आहेत.त्यात दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या अग्रीम देण्याची घोषणा केली आहे.त्यावर राज्यभर टीका होत असून सामाजिक माध्यमांवर मोहळ उठले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सल्लागार समितीच्या हातून किती आपल्या शेती सिंचनासाठी किती पाणी मिळणार आणि पिण्याच्या पाण्यासाठी किती पाणी राखून ठेवणार याची चिंता लागून राहिली आहे.दरम्यान उद्या भंडारदरा व आणि निळवंडे धरणाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केली असून त्याकडे भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवा कृती समितीने ही मागणी केली आहे.     
 

 

“कोपरगाव तालुक्यातील नैऋतेकडील अद्याप दुष्काळी असलेल्या जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर,अंजनापूर पूर्व,बहादरपूर पश्चिम आदी गावांना पाणी मिळालेले नाही.यावर्षी तर जवळपास दुष्काळच जाहीर झाला आहे.त्यामुळे निळवंडे उजव्या डाव्या कालव्याचे आवर्तन सोडणे गरजेचे आहे.नाही तर दुग्ध,कुक्कुटपालन तत्सम शेती पुरक व्यवसाय अडचणीत येतील.चारा पिके शिल्लक राहणार नाही.जमिनीची भूजल पातळी खोलवर गेलेली आहे.त्यामुळे शेती सिंचनाचे पाणी महत्वाचे ठरणार आहे”-गंगाधर रहाणे,कार्याध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती.

    त्यांनी संबंधित मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”वर्तमानात राज्य सरकारने दुष्काळ सदृश स्थिती जाहीर केली असून त्याची दुसरी कळ (ट्रिगर) जाहीर केली आहे.त्यामुळे आगामी काळात दुष्काळ मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्याने त्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे.अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यातील सह 182 गावे निळवंडे धरणाचे लाभक्षेत्रात येत आहे.येथे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे.मात्र निळवंडे कालवा कृती समितीने नानासाहेब जवरे यांचे मार्गदर्शनाखाली व ॲड.अजित काळे यांचे मोफत विधी सहाय्याने न्यायिक व रस्त्यावरील आंदोलने करून निळवंडे धरणाचे पाणी 31 मे  2023 रोजी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे.मात्र अद्याप समितीचे कार्यकर्ते असलेल्या जवळके,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर,अंजनापूर पूर्व,बहादरपूर पश्चिम आदी गावांना पाणी मिळालेले नाही.यावर्षी तर जवळपास दुष्काळच जाहीर झाला आहे.त्यामुळे निळवंडे उजव्या डाव्या कालव्याचे आवर्तन सोडणे गरजेचे आहे.नाही तर दुग्ध,कुक्कुटपालन तत्सम शेती पुरक व्यवसाय अडचणीत येतील.चारा पिके शिल्लक राहणार नाही.जमिनीची भूजल पातळी खोलवर गेलेली आहे.निळवंडे लाभक्षेत्राचे 182 गावांचे हद्दीत नदीवर असलेल्या पाझर तलाव व के.टी.वेअर भरून द्यावे.उजव्या व डाव्या कालव्याचे पाणी मिळाले नाही तर जनावरांना चारा,ग्रामस्थांना पिण्याचे पाणी शिल्लक राहणार नाही.त्यामुळे डाव्या आणि उजव्या कालव्याला चाचणीपूर्व किमान चार आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी करत आहे.या मागणीची कालवा सल्लागार समितीत गांभीर्याने दखल घेण्यात यावी व आगामी प्रतिकूल कालखंडात चार आवर्तन देण्यात यावे अशी मागणी रूपेंद्र काले,गंगाधर रहाणे,संजय गुंजाळ,रमेश दिघे,भागवतराव आरोटे,मच्छिंद्र दिघे,उत्तमराव जोंधळे,बाबासाहेब गव्हाणे,विलास गुळवे,सौरभ शेळके,भाऊसाहेब गव्हाणे,वाल्मीक नेहे,नाना नेहे,अशोक गांडोळे,कौसर सय्यद,सोन्याबापू उऱ्हे,भाऊसाहेब शिंदे,रावसाहेब मासाळ,वसंत थोरात,सुनील वर्पे,यांनी शेवटी केली आहे.

   “गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता गोदावरी कालव्यातून किती आवर्तन,कधी मिळणार या बाबत शेतकऱ्यांत तर्कवितर्क निर्माण झाले होते याची गरज ओळखून आ.आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचेकडे केली होती.त्याची दखल घेऊन उद्या दि.२४ रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित केली असल्याचा दावा आ.काळे यांनी केला आहे.

    सदर निवेदनाच्या प्रति शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,कोपरगाचे आ.आशुतोष काळे,निळवंडेचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे आदींना दिल्या आहेत.त्यामुळे आता दुष्काळी गावांना आपल्या हक्काचे किती पाणी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

  दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसात जवळके,बहादरपुर,तळेगाव दिघे,वाकडी,धनगरवाडी,चितळी,जळगाव,चिंचोली गुरव,देवकौठे,अंजनापूर,धोंडेवाडी, वेस सोयगाव आदी ग्रामपंचायतींनी आपल्या दुष्काळी आवर्तनाच्या पाण्याची मागणी नोंदवली असून अन्य ग्रामपंचायतींनी आपल्या पाण्याची नोंदणी तत्काळ कार्यकारी अभियंता,उर्ध्व प्रवरा प्रकल्प – 2 घुलेवाडी,संगमनेर यांच्या इमेलवर करावी असे आवाहन अध्यक्ष रूपेंद्र काले यांनी शेवटी केले आहे.
     

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close