जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

… या कालव्याच्या अस्तरीकरणाविरुद्ध शेतकऱ्यांचे बंड!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    गोदावरी उजव्या तट कालव्याच्या सिमेंट कॉंक्रीट अस्तरीकरणामुळे भूजल पातळी खालावून विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडण्याची भीती व्यक्त करत सिन्नर आणि कोपरगाव तालुक्यांतील शेतकरी आक्रमक झाले होते त्यांनी मेंढी- सोमठाणे गावांच्या शिवेवरील देव नाल्याच्या दुतर्फा सुरू असलेले अस्तरीकरणाचे काम शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी बंद पाडले असल्याची बाब उघड झाली आहे.संबंधित कंपनीने काम तात्पुरते थांबवले असले,तरी अस्तरीकरणाला कायमस्वरूपी स्थगिती न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सिन्नर तालुक्यातील मेंढी- सोमठाणे गावांच्या शिवेवरील देव नाल्याच्या दुतर्फा सुरू असलेले अस्तरीकरणाचे काम शेतकऱ्यांनी नुकतेच सकाळी ११ ते दुपारी १.३०  यावेळेत बंद पाडले असल्याची बाब उघड झाली आहे त्याचे छायाचित्र.

“गोदावरी कालव्यांचे पाणी जर इंग्रजांनी पर्जन्य छायेखालील दुष्काळी गावांना निर्माण केले होते आणि त्यात शेती क्षेत्राचे सिंचन होणे गरजेचे असताना स्वातंत्र्यानंतर आलेल्या स्वदेशी काळ्या इंग्रजी नेत्यांनी ते उद्योगांना आणि महापालिकांना वाटून दिले आहे.सदर पाणी मिळविण्यासाठी उद्योग,महापालिका यांना स्वतंत्र पाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, या शिवाय पश्चिम सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पश्चिमेस समुद्राला जाणारे पाणी पूर्वेस वळवून नगर नाशिक आणि मराठवाड्याची पाणी तूट भरून काढायला हवी- रूपेंद्र काले,सचिव,राज्य शेतकरी संघटना.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कालव्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणामुळे पाण्याचा नैसर्गिक पाझर थांबून परिसरातील भूजल पातळीवर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.परिणामी पिण्याचे पाणी,जनावरांसाठी पाणी आणि फळबागांसह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्जे घेऊन शेतीत मोठी गुंतवणूक केली आहे. पाणीच उपलब्ध झाले नाही,तर शेती कशी करायची आणि कर्जाची परतफेड कशी करायची,असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.कालव्याची आवश्यक देखभाल व दुरुस्ती करण्यास शेतकऱ्यांचा विरोध नसून,सिमेंट अस्तरीकरणाचे काम थांबवावे,अशी त्यांची मागणी आहे.यापूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन देऊनही काम सुरू राहिल्याने शेतकऱ्यांनी थेट घटनास्थळी धडक देत आंदोलन केले.

या लढ्यात सिन्नर-कोपरगावातील शेतकरी सहभागी असल्याचे उघड झाले असून त्यात कोपरगाव तालुक्यातील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ चांदगुडे,सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमरे आदी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसून येत आहे.

“गोदावरी कालव्यांचे अस्तरीकरण भूजल पातळी वाढविण्यासाठी तातडीने थांबवणे गरजेचे आहे.ते जलसंपदा विभागाने न थांबवल्यास शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील त्याची सर्वस्वी जबाबदारी जलसंपदा विभागाची राहील”-सोमनाथ चांदगुडे,माजी अध्यक्ष,भाजप,कोपरगाव तालुका.

  दरम्यान यावेळी आंदोलनकर्त्यांनी गोदावरी उजवा तट कालव्याचे सहाय्यक अभियंता सौरभ गीते यांना निवेदन दिले आहे.शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयाला कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.त्यानंतर कंपनीने अस्तरीकरणाचे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवले.मात्र,काम कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

  दरम्यान या लढ्यात सिन्नर-कोपरगावातील शेतकरी सहभागी असल्याचे उघड झाले असून त्यात कोपरगाव तालुक्यातील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ चांदगुडे,सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमरे,योगिराज घुमरे,द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक विजय घुमरे,आबासाहेब जाधव,साहेबराव जाधव,बद्रीनाथ कोकाटे,विनायक धोक्रट,सोमनाथ घुमरे,ज्ञानेश्वर डेंगळे,रावसाहेब गोरडे,अण्णासाहेब पानगव्हाणे, नीलेश गिते,सर्जेराव गिते आणि अजित गाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले  आहे.

   दरम्यान या संघर्षात सिन्नर तालुक्यातील चोंढी,मेंढी,सोमठाणे,सांगवी,पुतळेवाडी,कारवाडी,शहा, विघनवाडी तसेच कोपरगाव तालुक्यातील वडगाव,बक्तरपूर,चास नळी आणि हंडेवाडी आदी गावांतील सुमारे १५० ते २०० शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close