जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
लोकसभा कामकाज

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ४०० विविध कामासाठी कोट्यवधींचा निधी दिला-खा.वाकचौरे

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)


  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील रुग्णांना पंतप्रधान सहाय्यता निधीच्या माध्यमातून आज पर्यन्त अतिगंभीर ६६ रुग्णांना ०१ कोटी ३७ लाख २३ हजार ५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले असून दोन वर्षात २७ कोटी ०९ लाखांची ३८६ कामे मंजूर केली असल्याची माहिती शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली आहे.

खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.

“आपण शिर्डी मतदार संघात जिल्हा परिषद शाळा,व्यायाम शाळा,सभामंडप,विविध नॉन प्लॅन रस्ते आदिसंह विविध कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा केला असून ती कामे लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.मात्र तो निधी खर्चात दिसत नाही.तो खर्ची पडण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी असतो.परिणामी अद्याप निधी अखर्चित दिसत असल्याचे सांगितले असून आपण आता सत्तेत आल्याने व डबल इंजिन सरकारमध्ये सामील झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात कामाच्या बाबतीत नक्कीच वरच्या स्थानी दिसणार आहे”- खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदारसंघ.

  शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कार्यकाळात १३५ विकासकामांसाठी १४.७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. तथापि,यातील केवळ ७१ लाख रुपये खर्च झाले असून २ कामे पूर्ण झाली आहेत,तर १३.९८ कोटी रुपयांचा निधी अद्याप अखर्चित असल्याचा चुकीचा दावा विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केला असून पूर्वग्रहदूषितपणे जाणीवपूर्वक बदनामी सत्र आरंभले आहे.त्यांचे आज खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना जोरदार खंडन केले आहे.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण आपल्या कार्यकाळात नगर-मनमाड रस्ता: शिर्डी मतदारसंघातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी नगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठी सुमारे अडीच हजार कोटींची तरतूद करण्याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांसमोर लोकसभेत आवाज उठवला होता.विविध रेल्वे प्रकल्पासाठी तीच बाब लागू आहे.यापूर्वी खासदार असताना त्यांनी संसदेत आंतरराष्ट्रीय गॅस पाइपलाइन आणि क्रीडा कल्याणकारी योजनांसारख्या अनेक विषयांवर ७८० हून अधिक महत्त्वाचे प्रश्न मांडले होते.शिवाय पहिल्या कार्यकाळात सर्वाधिक प्रश्न मांडणाऱ्या खासदारात चौथे स्थान मिळवले होते.शिर्डी मतदार संघात सर्वाधिक सभामंडप दिलेच पण लोकप्रतिनिधींना मिळणारे मानधन सामाजिक,धार्मिक संस्थांना प्रदान केले होते.

  दरम्यान वर्तमान काळात दोन वर्षात आपण,”शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ६६ विविध रुग्णांना पकांतप्रधान सहायता निधीतून ०१ कोटी ३७ लाखांचे अर्थ सहाय्य केले आहे.शिवाय कोपरगाव तालुक्यातील ०९ रुग्णांना २४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचे सहाय्य केले आहे.नेवासा तालुक्यात १४ रुग्णांना ३८ लाख ५० हजार,राहता तालुक्यात ०८ रुग्णांना २२ लाख २५ हजार, संगमनेर तालुक्यात १५ रुग्णांना ४१ लाख ८८ हजार,श्रीरामपूर तालुक्यात १८ रुग्णांना ४१ लाख ३४ हजार ५०० व अकोले तालुक्यातील ०१ रुग्णास ०२ लाख ६२ हजार ५०० मात्र व पुण्यातील एका रुग्णास ०३ लाख असे एकूण ०१ कोटी ३७ लाख आठ सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी संबंधित रुग्णालय हे पंतप्रधान सहाय्यता निधीच्या ‘पॅनल’वर असणे आवश्यक असल्याची माहिती खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली आहे.

  दरम्यान शिर्डी मतदार संघात जिल्हा परिषद शाळा,व्यायाम शाळा,सभामंडप,विविध नॉन प्लॅन रस्ते आदिसंह विविध कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा केला असून ती कामे लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.मात्र तो निधी खर्चात दिसत नाही.तो खर्ची पडण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी असतो.परिणामी अद्याप निधी अखर्चित दिसत असल्याचे शेवटी सांगितले असून आपण आता सत्तेत आल्याने व डबल इंजिन सरकारमध्ये सामील झाल्याने कामाच्या बाबतीत नक्कीच वरच्या स्थानी दिसणार असून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close