नगर जिल्हा
..या तालुक्यात शेतकरी सन्मान योजनेचे २.१४ कोटी जमा
संपादक-नानासाहेब जवरे
साकुरी-(प्रतिनिधी)
कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे शेतकरी व सर्व सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेले आहे शेतकरी. लोकांना मोठा आधार ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत राहाता तालुक्यातील जवळपास २० हजार ७४६ पात्र शेतकरी लोकांच्या बॅन्क खात्यात २ कोटी १४ लाख रुपये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जमा केले आहे.
अल्प व अत्यल्प जमीन असणार्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली.२ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते.या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत.
शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ नियमीत पणे दिला जातो मात्र लाॅकडाउन काळात तातडीने या योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आधार ठरलेल्या या योजनेचा लाभापोटी प्रत्येकी दोन हजार रुपये थेट बँक खात्यात तातडीने वर्ग केल्यामुळे राहता तालुक्यातील शेतकरी बांधवामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. त्या बरोबरच केन्द्र व राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेत समावेश असलेल्या ७ हजार ४०० लाभार्थीना ७९ लाख तर इंदिरा गांधी निराधार योजनेतील श्रावणबाळ जेष्ठ नागरिक आदींसह असलेल्या पात्र १० हजार ६२९ पात्र लाभार्थी यांना १ कोटी ७५ लाख अशी जवळपास जानेवारी फेब्रुवारी पोटी १ कोटी ८६ लाख ८२ हजाराची रक्कम त्यांच्या बॅंकांच्या खात्यात वर्ग केली गेली आहे. विविध योजनांचा लाभ लोकांना देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.त्यामुळे या अडचणीच्या काळात सर्व सामान्य गरजु कुटुंबातील लोकांना हा मोठा आधार ठरला आहे. यासाठी राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांचेसह कार्यालयातील कर्मचारी सतिश पाटोळे, अनिल फोफसे, तुपे त्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. या योजनेच्या २० हजार ७४६ शेतकऱ्यांना दोन कोटी १४ लाख तर संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना यातील १८ हजार ०२९ लाभार्थीना १ कोटी ८३ लाख अशी चार कोटी रुपयांच्या भरीव लाभ राहाता तालुक्यातील जनतेला मिळाला आहे यामुळे राहाता तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.