जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दिव्यांगांना वस्तूंचे मोफत वितरण !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील श्री साई आधार फाउंडेशन व श्रीराम दिव्यांग सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने संवत्सर येथे नुकताच  दिव्यांग बांधवांना विविध वस्तू वितरित करण्यात आल्या आहेत.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"आयुष्यात जितक आपल्याला देवांने दिल त्यातलं थोड अशा व्यक्तींना द्या की ज्यांना आपल्या तुलनेत काहीच मिळत नाही आपण आज आहोत तर उद्या नाही त्यामुळे नेहमी. दिव्यांग वक्ती व गरजू व्यक्तींना मदत करत रहावे"-गोकुळ पावडे,अध्यक्ष,श्रीराम दिव्यांग सेवा प्रतिष्ठान,संवत्सर.

   महाराष्ट्र शासनाचा ‘दिव्यांग कल्याण विभाग’ (आता ‘दिव्यांग सक्षमीकरण विभाग’) राज्यातील सुमारे ३० लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी व हक्कांच्या संरक्षणासाठी १५ डिसेंबर २०२२ पासून कार्यरत स्वतंत्र विभाग आहे.हा विभाग शिष्यवृत्ती,पेन्शन,स्वयंरोजगार,कौशल्य विकास आणि विशेष शाळांसारख्या योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत असताना काही सामाजिक संस्थाही या दिव्यांगांना मदत करत असल्याचे दिसत आहे.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथेही हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

या उपक्रमामुळे गरजू अपंगानी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
  या प्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष म्हणाले की ,”आयुष्यात जितक आपल्याला देवांने दिल त्यातलं थोड अशा व्यक्तींना द्या की ज्यांना आपल्या तुलनेत काहीच मिळत नाही आपण आज आहोत तर उद्या नाही त्यामुळे नेहमी. दिव्यांग वक्ती व गरजू व्यक्तींना मदत करत रहावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close