महिला बालविकास विभाग
…या जि.प.शाळेत महिला दिन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादराबाद येथे ८ मार्च निमित्त जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण पाचोरे हे होते.

“जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो,जो महिलांच्या सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान करणारा दिवस आहे.हा दिवस लैंगिक समानता,महिला सक्षमीकरण,हक्क आणि त्यांच्या संघर्षाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो”-अश्विनी विक्रम पाचोरे,सरपंच,बहादराबाद,ग्रामपंचायत..
जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो,जो महिलांच्या सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान करणारा दिवस आहे.हा दिवस लैंगिक समानता,महिला सक्षमीकरण,हक्क आणि त्यांच्या संघर्षाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो.हा केवळ उत्सवाचा दिवस नसून,महिलांवरील अन्यायाविरोधात जागृती आणि आत्मपरीक्षणाचा दिवस आहे.याचा उद्देश महिलांच्या हक्कांना पाठिंबा देणे,लिंगभेद संपवणे आणि त्यांना समान संधी मिळावी यासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे.१९०८ मध्ये न्यूयॉर्कमधील स्त्री कामगारांच्या आंदोलनातून याची सुरुवात झाली होती.१९१० मध्ये ‘क्लारा जेटकिन’ यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून ८ मार्चचा प्रस्ताव मांडला,जो पुढे १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मान्य केला गेला.हा दिवस स्त्रीशक्तीचा गौरव करतो आणि त्यांना आत्मविश्वासाने जगण्यासाठी प्रेरित करतो.तो कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद जिल्हा परिषद शाळेसह तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच अश्विनी पाचोरे,महिला सदस्य,अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष पारासुर यांनी महिलांचे समाजातील योगदान व महिला सक्षमीकरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.उपशिक्षिका सुनीता गुंजाळ यांनीही महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार सांगितले.यावेळी उपस्थित ग्रामपंचायत महिला ग्रामपंचायत सदस्य आरती पाचोरे,महिला सदस्य,अंगणवाडी सेविका सुलोचना पाचोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी सहकार्य केले.शेवटी उपस्थितांचे आभार सुनीता गुंजाळ यांनी आभार मानले आहे



