जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
  आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील (ऊबाठा) शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर  करण्यात आले असून यात उपजिल्हाप्रमुख म्हणून अमर कतारी राजपूत संगमनेर यांची तर कोपरगाव तालुक्यातील रंगनाथ गव्हाणे यांची कोपरगाव ग्रामीण उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली असून अस्लम शेख यांची कोपरगाव शहर प्रमुखपदी तर भरत मोरे यांची कोपरगाव पूर्व ग्रामीण,तर श्रीरंग चांदगुडे यांची कोपरगाव ग्रामीण दक्षिण-पश्चिम निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  

दरम्यान शहरप्रमुख म्हणून अमित चव्हाण संगमनेर शहर उत्तर,फैसल सय्यद संगमनेर शहर दक्षिण,बालाजी गोर्डे कोपरगाव शहर उत्तर,गगनभय्या हाडा यांची कोपरगाव शहर दक्षिण पदी निवड जाहीर केली आहे.याशिवाय शहर संघटक पुढील प्रमाणे जाहीर केले आहे त्यात असिफ तांबोळी संगमनेर शहर यांची निवड केली आहे.

  कोपरगाव नगरपरिषद निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून यात शिवसेनेचे विजयी मूल्यांकन जास्त असताना केवळ फुटकळ झाल्याने व प्रस्थापित नेत्यांनी ती जाणीवपूर्वक केल्याने मोठा अनर्थ घडवला होता.व मोठी लांडगेतोड केली होती.त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली होती.त्यामुळे शिव सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आणि माजी शहर प्रमुख भरत मोरे यांच्यात दोन गट झाले होते.याशिवाय आधीच एक गट कोल्हे भाजप गटाला मिळाला होता.त्यामुळे शिवसेनेने विजय निश्चित असताना आपल्या पायावर धोंडा पाडुन घेतला असल्याचे उघड झाले आहे.आता आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या पक्षाची घडी बसविण्यासाठी शिवसेनेने दंड थोपटले आहे.आणि नुकतीच मुंबई कार्यालयातून नूतन पदाधिकारी जाहीर केले आहे.

   त्यात त्यांनी संगमनेर पश्चिम तालुकाप्रमुख म्हणून भाऊसाहेब हासे यांची तर भीमाशंकर पावसे संगमनेर पूर्व म्हणून तर भरत मोरे यांची कोपरगाव पूर्व ग्रामीण म्हणून वर्णी लागली आहे.याशिवाय श्रीरंग चांदगुडे यांची कोपरगाव ग्रामीण  दक्षिण-पश्चिम म्हणून झेंडा रोवला आहे.याशिवाय विधानसभाप्रमुख म्हणून योगेश खेमनर,संगमनेर विधानसभा तर उपजिल्हाप्रमुख म्हणून अमर कतारी राजपूत संगमनेर,रंगनाथ गव्हाणे कोपरगाव ग्रामीण,अस्लम शेख (कोपरगाव शहर) यांची वर्णी लावली आहे.

  दरम्यान शहरप्रमुख म्हणून अमित चव्हाण संगमनेर शहर उत्तर,फैसल सय्यद संगमनेर शहर दक्षिण,बालाजी गोर्डे कोपरगाव शहर उत्तर,गगनभय्या हाडा यांची कोपरगाव शहर दक्षिण पदी निवड जाहीर केली आहे.याशिवाय शहर संघटक पुढील प्रमाणे जाहीर केले आहे त्यात असिफ तांबोळी संगमनेर शहर यांची निवड केली आहे.

   तर विधानसभा संघटक म्हणून दिपक साळुंके संगमनेर विधानसभा यांना पसंती दर्शवली आहे.या शिवाय शहर समन्वयक म्हणून बाळासाहेब घोडके संगमनेर शहर,तालुका समन्वयक म्हणून अशोक सातपुते संगमनेर तालुका यांना पुढे केले आहे.याशिवाय तालुका संघटक म्हणून संजय फड संगमनेर तालुका यांची वर्णी लावली आहे.तर उपजिल्हा संघटक म्हणून  रंगनाथ फटांगरे संगमनेर ग्रामीण यांना हिरवा झेंडा दिला आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचेसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close