व्यक्ती विशेष
निळवंडे प्रकल्पात अजित पवारांचे मोठे योगदान !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये आज सकाळी लँडिग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.विमानातील ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.त्यात अजित पवार यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यांच्या पाटबंधारे मंत्री पदाचे काळात निळवंडे कालवा कृती समितीला मोठी मदत मिळाली त्याचे स्मरण करणारा हा लेख.

दरम्यान कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सन-२००६ साली राज्यातील कुक्कुट पालकांच्या वतीने ‘बर्ड फ्ल्यू’चे संकट आल्यावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या अनेक आमदारांनी हा प्रश्न सुटण्यासाठी विधानसभेच्या उन्हाळी अधिवेशनात मोठा आवाज उठवला होता. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना प्रति पक्षी २० रुपयांची नुकसान भरपाई मिळाली होती.एवढे नव्हे तर गेली पाच ते सात वर्षे शेतकऱ्यांना पोल्ट्री फार्मचे थकलेले २०० कोटी रुपयांचे अनुदान मिळण्यास मदत झाली होती.याचे स्मरण या निमित्ताने होत आहे.
दरम्यान सदर विमान हे धावपट्टीपासून विमान बाजुला गेले अन् अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.धावपट्टीवरुन विमान घसरल्यानंतर आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातात विमानाने पेट घेतल्याने आजुबाजुच्या परिसराला आग लागली होती. बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते.त्यासाठी विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते.बारामती विमानतळावर विमान उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने हे विमान आदळल्याने त्या विमानाला आग लागली,असे प्रथमदर्शनी समजते आहे.या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले आहे.हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळाली नाही,मात्र वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.ते काहीही असो.मात्र कायम विविध विधानांनी चर्चेत असलेले व प्रशासनावर मजबूत पकड असलेले कधीकाळी गोसी प्रकल्पामुळे अडचणीत आलेले नेतृत्व त्यामुळे काळाच्या पडद्याआड गेले आहे.त्यामुळे यांनी केलेली अनेक कामे मनचक्षूसमोर उभी न राहिली तर नवल ! विशेषतः त्यांनी निळवंडे कालव्याच्या कामात सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या संगमनेर तालुक्यातील कोठे-कमळेश्वर येथील सुमारे ०४ कि.मी.बोगद्याचे काम मार्गी लावण्यासाठी आपल्या पाटबंधारे मंत्री असतानाच्या काळात सन-२००७ साली मोठी जबाबदारी उचलली होती.त्याला कारण झालेले होते तत्कालीन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव स्व.खा.गोविंदराव आदिक.

तत्कालीन राज्यसभेचे खा.गोविंदराव आदिक यांनी अजित पवार यांना निळवंडेची व्यथा सांगून शेतकऱ्यांना आपल्याला न्याय द्यावा लागणार असल्याचे सांगत संबंधित बोगद्यासाठी जवळपास ५३ कोटींचा निधी लागणार असल्याचे सांगून टाकले होते.त्यावेळी अजित पवार यांनी लागलीच आपल्या स्वीय सहायकास मुख्य सचिवास फोन लावण्यास सांगितले आणि हे काम आदिक साहेबांच्या नावावर टाकण्यास सांगितले होते.आणि विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसात या प्रश्नाला वाचा फुटली होती.आणि सन-२००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्व काळात या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले होते.
दरम्यान दिडच वर्षापूर्वी म्हणजेच २००६ च्या उन्हाळ्यात त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात एकत्र येऊन निवडणूक लढवली होती.त्याचा परिणाम विपरीत होऊन त्यांना टक्कर देण्यासाठी साई संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथ गोदकर यांनी विरोधकांना एकत्र करून स्वतंत्र पॅनल लढविला होता.त्यांना सहाय्य केले होते.कम्युनिस्ट नेते स्व.चंपालाल सांड यांनी.त्यात डॉ.गोंदकर गटाला नऊ जागा मिळाल्या होत्या.तर दोन ते तीन जागा अवघ्या एक ते तीन मतांनी हरल्या होत्या.म्हणजे विखे आणि कोल्हे एकत्र येऊनही त्यांचे बोटावर निभावले होते.त्यावेळी आमच्याकडे या मंडळींनी त्यांचे प्रसिद्धी प्रमुखाची जबाबदारी सोपवली होती.त्यावेळी निवडणुका संपल्यावर शिर्डी नगरपरिषदेच्या समोर असलेल्या प्रांगणात डॉ.गोंदकर यांनी मोठ्या (विजयी!) सभेचे आयोजन केले होते.त्यात अर्थातच प्रमुख उपस्थिती आणि भाषण हे तत्कालीन खा.गोविंदराव आदिक यांचे होते.सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.सभा संपल्यावर त्यांच्या चहापानाची आणि जेवणाची सोय,’हॉटेल यशोसन’ या ठिकाणी केली होती.त्यावेळी डॉ.गोंदकर यांनी माझी आणि खा.गोविंदराव आदिक यांची ओळख करून दिली होती.त्यावेळी त्यांनी या मोठ्या जागा मिळण्यात आपल्याला या माणसाचे म्हणजेच माझे मोठे योगदान असल्याचे अधोरेखित केले होते.अर्थातच खा.आदिक यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून शाबासकीची थाप मारली होती.व तुमचे काही काम असेल तर जरूर मला सांगा असे आश्वासन दिले होते.पुढे आम्ही काकडी (शिर्डी) विमानतळाचा प्रश्न मार्गी लावल्या नंतर निळवंडे कालवा कृती समितीत आम्ही सक्रीय झालो होतो.त्यावेळी या क्षेत्रातील काही तज्ञांनी आमच्या लक्षात आणून दिले होते की निळवंडे कालव्यांचे काम इतरत्र करणे सोपे आहे.मात्र हे कालवे करण्यात सर्वात मोठी अडचण ही संगमनेर तालुक्यातील कोठे-कमळेश्वर येथील डोंगर रांगेत असून या ठिकाणी चार कि.मी.चा डोंगरात बोगदा खोदावा लागणार आहे.तरच उर्वरित दुष्काळी १८२ गावांना व त्यांचे शेती क्षेत्राला पाणी देता येणार आहे.आणि हा बोगदा करण्यास मोठा कालावधी लागणार आहे.शिवाय याला मोठा निधी लागणार आहे.त्यामुळे आम्हाला एका जबाबदार नेत्याची गरज भासू लागली होती.त्यासाठी आम्ही अशा नेत्याचा शोध सुरू केला होता.अर्थातच माझे माहितीत आणि त्याच पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून लगेच खा.गोविंदराव आदिक यांचे नाव डोळ्यासमोर न तरळले तर नवल होते.त्याप्रमाणे आम्ही हालचाली सुरू केल्या होत्या.आणि याबाबत खा.आदिक यांचे भाचे जावई असलेले डॉ.एकनाथ गोंदकर यांना गाठले होते.त्यांनी या गोष्टीला तत्काळ होकार दिला होता.व लगेच मोबाईल फिरवून खा.आदिक यांची वेळ घेतली होती.तर दुसरीकडे आम्ही जनतेत जनजागृती सुरु केली होती.
दरम्यान आमची कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर या ठिकाणी जनजागृती सभा सुरू असतानाच आम्ही डॉ.गोंदकर यांना फोन करून याचा पाठपुरावा करू लागलो असता समोरून डॉ.गोंदकर यांनी आम्हाला सांगितले की,”खा.आदिक साहेब दोन दिवसांनी नाशिक दौऱ्यावर आहेत.आणि त्या ठिकाणी,’सर्किट हाऊस ‘ या ठिकाणी आपल्या शिष्टमंडळाला भेटू शकतील.त्याप्रमाणे आम्ही सकाळी सकाळी आमचे शिष्टमंडळ घेऊन नाशिक येथील त्र्यंबकरोडला असल्या सर्किट हाऊस मध्ये पोचलो होतो.

कोपरगाव शहरातील शहर आणि तालुका पोलिस ठाणे,आणि पोलिस वसाहत इमारती उभ्या करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आ.आशुतोष काळे यांना मोठे योगदान लाभले होते.
आमच्या शिष्टमंडळात डॉ.गोंदकर,आम्ही स्वतः,कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले,गंगाधर रहाणे,स्व.विठ्ठलराव रहाणे,अंजनापूर येथील बाबासाहेब गव्हाणे,कैलास गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,रमेश दिघे,कौसर सय्यद,आदी लवाजमा घेऊन निघालो होतो.सर्किट हाऊसला खा.आदिक आमची वाटच पाहत होते.आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर सोपस्कार झाले आणि लगेच विषयाला भिडलो होतो.त्यावेळी या कालव्याच्या कामात सर्वात मोठी अडचण आम्ही संगमनेर तालुक्यातील कौठे-कमळेश्वर येथील चार कि.मी.च्या बोगद्याची असल्याची लक्षात आणून दिल्यावर व त्याला जवळपास ५३ कोटी रुपयांचा अंदाजपत्रकाप्रमाणे खर्च असल्याचे सांगितले होते.त्याप्रमाणे त्यांनी विषय अवगत झाल्यावर लगेच तत्कालीन जलसंपदा मंत्री असलेले अजित पवार यांना फोन फिरवला व आमचे शेतकऱ्यांचे शिष्ट मंडळ तुम्हाला भेटण्यास येणार आहे असे बजावलं होते.त्यावेळी अजित पवार यांनी आम्हाला दोनच दिवसांत,’ रामटेक ‘ या त्यांच्या शासकीय बंगल्यावर भल्या सकाळी बोलवले होते.

दरम्यान बोगदा मंजूर झाल्यानंतर त्याचे आगामी पाच वर्षात म्हणजेच जवळपास २०१४ साली पूर्ण झाले होते.नंतर या कामाला वाढीव निधी लागून ही अंदाजपत्रक जवळपास ६५ कोटींवर गेले होते.पुढे उद्धव ठाकरे यांचे राज्यात महाआघाडी सरकार सत्तेत आल्यावर माजी खा.प्रसाद तनपुरे यांचे सहाय्याने जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना त्यांनी २९ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रालयात एक बैठक घेऊन या प्रकल्पाचे कामास अवघ्या दोन वर्षात विक्रमी १०५६ कोटी रुपयांचा विक्रमी निधी दिला होता हे विसरता येणार नाही.
दरम्यान आम्ही सर्व मंडळी रात्रीच मुक्कामी जाऊन थांबलो होतो.व सकाळी खा.आदिक आम्हाला घेऊन,’ रामटेक ‘ या ठिकाणी येऊन गेले होते.त्यावेळी जवळपास सात वाजले होते.आम्ही गेलो त्यावेळी अजित दादांचे काम सुरू असल्याचे जाणवले होते.त्यांचे बंगल्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी आदींची धावपळ सुरू होती.आम्ही बंगल्यात जातातच त्यांनी आगतस्वागत केले.आणि खा.आदिक यांनी लगेच मुख्य विषयाला हात घातला होता.अरे अजित ! (आदिक साहेब अजित पवार यांना हे अधिकार वाणीने बोलत असत हे त्या आम्हाला त्या भेटीत दिसून आले होते)”हे आमचे कार्यकर्ते आहेत.त्यांच्या कामांची तड लागण्यास हवी” असे सांगून त्यांनी निळवंडे धरणाची सर्व हकीकत सांगून हा प्रकल्प खूपच उशीराने होत असून शेतकऱ्यांना आपल्याला न्याय द्यावा लागणार असल्याचे सांगून कामाचा गाभा सांगून टाकला.व संबंधित बोगद्यासाठी जवळपास ५३ कोटींचा निधी लागणार असल्याचे सांगून टाकले होते.त्यावेळी अजित पवार यांनी लागलीच आपल्या स्वीय सहायकास मुख्य सचिवास फोन लावण्यास सांगितले आणि हे काम आदिक साहेबांच्या नावावर टाकण्यास सांगितले होते.आणि विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसात या प्रश्नाला वाचा फुटली होती.आणि सन-२००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्व काळात या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले होते.त्यावेळी स्वतः पाटबंधारे मंत्री म्हणून अजित पवार हे होतेच पण तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर नगर जिल्ह्यातील अन्य वादग्रस्त नेते श्रेय घेण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.मात्र या बड्या धेंडाच्या श्रेयवादाच्या लढाईत आम्ही कोठे हरवलो होतो हे आम्हालाही समजले नाही.आज या प्रकरणाची प्रकर्षाने जाणीव होत आहे.अजित पवार हे शब्दाला जागणारे होते.त्यांच्या एका आदेशाने आमचे गेली ५६ वर्षे प्रलंबित असलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या कामात सर्वात मोठा अडथळा असलेले कौठे-कमळेश्वर येथील चार कि.मी.बोगद्याचे काम मार्गी लागले ते काम न्यू.एशियन कंपनीने घेतले होते.ते आगामी पाच वर्षात म्हणजेच जवळपास २०१४ साली पूर्ण झाले होते.नंतर या कामाला वाढीव निधी लागून ही अंदाजपत्रक जवळपास ६५ कोटींवर गेले होते.पुढे महा आघाडी सरकार सत्तेत आल्यावर माजी खा.प्रसाद तनपुरे यांचे सहाय्याने जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाचं कामास अवघ्या दोन वर्षात विक्रमी १०५६ कोटी रुपयांचा विक्रमी निधी दिला होता हे विसरता येणार नाही.त्यामुळेच आम्हाला आगामी काळात उर्वरित कामासाठी केंद्रीय जल आयोगाकडून खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे मार्फत १७ पैकी १४ मान्यता आणता आल्या.मात्र सरकार बदलल्यावर मात्र त्याला अडचणीची सुरुवात झाली.त्यानंतर आम्ही समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्टेंबर २०१६ साली उच्च न्यायालयात ॲड.अजित काळे यांचे विधी सहाय्याने नानासाहेब जवरे आणि विक्रांत रुपेंद्र काले यांचे माध्यमातून जनहित याचिका (क्रं.१३३/२०१६) दाखल करून उर्वरित ०३ मान्यता मिळवल्या होत्या.म्हणून आज हा प्रकल्प ३१ मे २०२३ मध्ये कालवे पूर्ण होऊन मार्गी लागला आहे.त्याचे वितरण व्यवस्था प्रगतीपथावर आहे.मात्र त्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे झालेले सहकार्य विसरता येणारे नाही.त्यांना निळवंडे कालवा कृती समिती अहिल्यानगर-नाशिक च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !



