शैक्षणिक
…या गावी प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत 77 वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.यावेळी ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण माजी ग्रामपंचायत सदस्य व शाळा समिती सदस्य प्रकाश गोरक्षनाथ थोरात यांचे हस्ते तर जिल्हा परिषद शाळा येथील ध्वजारोहण कार्यक्रम माजी सैनिक वाल्मीक बाबुराव थोरात यांचे हस्ते तर दक्षिण रेल्वे सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे माजी सदस्य नानासाहेब जवरे,सरपंच सारिका विजय थोरात यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपअभियंता एस.के.थोरात हे होते.

“राज्य सरकारकडून गेल्या दोन वर्षे ग्रामपंचायतीना विकासकामांना मिळणारा पंधराव्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे मंजूर असूनही ती करता येत नसल्याने सरकारने हा निधी ग्रामपंचायतीना तातडीने उपलब्ध करून द्यावा”-एस.के.थोरात,माजी अभियंता,जलसंपदा विभाग.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले होते.दिडशे वर्षांच्या संघर्षानंतर भारतातील इंग्रजांच्या राजवटीचा अंत झाला होता.ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा देशभरात इंग्रजांनी स्थापन केलेली राज्यव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था होती.स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी स्वतःची राज्यव्यवस्था स्थापन करण्यासाठी ‘संविधान सभे’ची स्थापना केली.देशासाठी संविधान तयार करण्याचे काम या संविधान सभेचे होते.संविधान सभेने तयार केलेले संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीयांनी स्वीकारले.त्यावेळी संविधानातील काही कलमे लागू झाली होती पण पूर्ण सविंधान लागू झाले नव्हते.नंतर २६ जानेवारी १९५० रोजी ‘भारतीय संविधान’ देशभरात पूर्णपणे अंमलात आले.त्यामुळे २६ जानेवारी १९५० पासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले.प्रजेची सत्ता सुरू झाली म्हणजेच भारत २६ जानेवारी १९४९ ला प्रजासत्ताक झाला.त्यामुळे दरवर्षी देशभरात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.या वर्षी जवळकेसह देशभर 77 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात संपन्न झाला आहे.

यावेळी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे विद्यार्थी आयुष शरद दरेकर (धावणे) प्रथम क्रमांक,नैतिक विलास थोरात (लांब उडी) प्रथम क्रमांक केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत वैष्णवी गणेश पन्हाळे वैयक्तिक गीत गायन प्रथम क्रमांक आदींना स्व.जयराम नाना पा.जवरे,गंगुबाई जयराम जवरे यांचे स्मृति प्रित्यर्थ रोख पुरस्कार देऊन तर पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका मंगल वामन आदींना गौरविण्यात आले आहे.
जवळके येथे त्या निमित्ताने तिरंगा हाती घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीचे आयोजन केले होते.त्यावेळी,”भारत माता की जय”,”वंदे मातरम्” आदींच्या घोषणांनी गाव दुमदुमुन गेले होते.त्या नंतर जवळके ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे.त्यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश थोरात यांचे हस्ते तर जिल्हा परिषद शाळेत माजी सैनिक वाल्मीक थोरात यांचे शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे.

जवळके ग्रामपंचायतीला सामाजिक उपयोगासाठी भूदान देणारे दाते नामदेव तुकाराम थोरात,स्व.साईनाथ रामचंद्र थोरात यांचे वतीने भाऊसाहेब साईनाथ थोरात तर जिल्हा परिषदेच्या जुन्या आणि जीर्ण शाळेचे निर्लेखन केले असल्याने नवीन शाळा खोल्यांचे काम सुरू आहे.त्यासाठी तात्पुरती शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सोय करण्यास मदत करणारे माजी ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला सुकदेव थोरात,प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र सुकदेव थोरात यांचा शाल,श्रीफळ देऊन सौरव करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुमित रोहमारे,दत्तात्रय थोरात,शिवसेना तालुका प्रमुख रावसाहेब थोरात,लक्ष्मण थोरात,ग्रामपंचायत उपसरपंच सुनील थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,वाल्मीक भोसले,उत्तम थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,मीना विठ्ठल थोरात,विठ्ठल थोरात,शाळा समिती अध्यक्ष महेश थोरात,सोसायटी अध्यक्ष सुधाकर थोरात,माजी शिक्षक संतू वाकचौरे,सखाहारी थोरात,माजी सैनिक राजेंद्र थोरात,राजेंद्र थोरात,डॉ.सुनील शिंदे,दत्तात्रय वाकचौरे,रखमा वाकचौरे,किसन पोकळे,ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे,तलाठी किशोर गटकळ,जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक मच्छिंद्र पावशे,सचिव रामनाथ वाकचौरे आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन नानासाहेब जवरे यांनी करताना,” ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेली जिल्हा परिषद शाळा इमारत,अंगणवाडी इमारत,रस्ते,सौर ऊर्जा,घर विहिरी आदी वैयक्तिक लाभाच्या योजनासह लाखो रुपयांच्या विविध विकास कामांची माहिती दिली आहे.अद्याप गेली दोन वर्षे सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या रकमा दिलेल्या नाहीत असा उल्लेख केला आहे.तर उपअभियंता एस.के.थोरात यांनी उपस्थित शाळेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे व ग्रामपंचायत राबवत असलेल्या विविध विकासकामांचे कौतुक केले आहे.मात्र सरकारकडून गेल्या दोन वर्षे निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे मंजूर असूनही ती करता येत नसल्याबाबद खेद व्यक्त केला आहे.

यावेळी जवळके ग्रामपंचायतीला सामाजिक उपयोगासाठी भूदान देणारे दाते नामदेव तुकाराम थोरात,स्व.साईनाथ रामचंद्र थोरात यांचे वतीने भाऊसाहेब साईनाथ थोरात आदींचा गौरव करण्यात आला आहे.तर जिल्हा परिषदेच्या जुन्या आणि जीर्ण शाळेचे निर्लेखन केले असल्याने नवीन शाळा खोल्यांचे काम सुरू आहे.त्यासाठी तात्पुरती शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सोय करण्यास मदत करणारे माजी ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला सुकदेव थोरात,प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र सुकदेव थोरात यांचा शाल,श्रीफळ देऊन सौरव करण्यात आला आहे.

दरम्यान यावेळी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे विद्यार्थी आयुष शरद दरेकर (धावणे) प्रथम क्रमांक,नैतिक विलास थोरात (लांब उडी) प्रथम क्रमांक केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत वैष्णवी गणेश पन्हाळे वैयक्तिक गीत गायन प्रथम क्रमांक आदींना स्व.जयराम नाना पा.जवरे,गंगुबाई जयराम जवरे यांचे स्मृति प्रित्यर्थ रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.तर अन्य गुण गौरव स्पर्धेत मानांकित विद्यार्थ्यांना दत्तात्रय थोरात व सुनील थोरात यांनी रोख बक्षिसे देऊन गौरवले आहे.या शिवाय राज्यस्तरीय दिव्यांग आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मंगल वसंत वामन यांना सरपंच सारिका थोरात यांचे हस्ते गौरविण्यात आले आहे.पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक मच्छिंद्र गेनू पावसे,शिक्षिका वैशाली सिताराम उंडे,कोमल उत्तम बागुल आदींचे मार्गदर्शन लाभले होते.
सदर प्रसंगी प्रास्तविक मुख्याध्यापक मच्छिंद्र पावशे यांनी केले आहे तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात यांनी मानले आहे.



