गृह विभाग
…या इमारतीच्या उद्घाटनाला लाभला मुहूर्त !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
गेली अनेक दशके इमारतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीला २८ कोटींचा निधी मिळाला आणि इमारतीसह पोलिस वसाहतीची इमारत पूर्ण होऊन जवळपास वर्षे उलटत आले असताना आता या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला असल्याची माहिती हाती आली असून आगामी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे सोमवार दि.०२ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे हस्ते उद्घाटन होणार असून संबंधित ठेकेदार आता शेवटचा हात मारण्यासाठी धावाधाव करताना दिसून येत आहे.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याची प्रशासकीय इमारत व दोन पोलिस वसाहतीच्या इमारतींचे काम वेळेत म्हणजेच २४ एप्रिल २०२४ रोजी पूर्ण केले होते.मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुका त्या पाठोपाठ नगरपरिषद निवडणुकांचा हंगाम सुरू झाला होता.त्यामुळे या इमारतीच्या उद्घाटनाचे काम करण्यास कोणालाही सवड मिळत नव्हती.त्या बाबत आमच्या प्रतिनिधीने मागील १५ जानेवारी रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.त्यानंतर आता ही उद्घाटन तारीख मुक्रर झाली असल्याचे मानले जात आहे.
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे विभाजन करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोकसंख्येचा निकष वापरून सन-२०१४ साली स्वतंत्र तालुका पोलिस ठाणे निर्माण केले होते.त्याचे सन-२०१५ साली गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे हस्ते त्याची स्थापना व उद्घाटन करण्यात आले होते.त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध होऊन नागरिकांना सोयी उपलब्ध झाल्या आहेत.

दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून राज्य सरकारकडून शहर पोलिस ठाण्याची इमारत मंजूर केली होती.तिचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे तत्कालीन आघाडी सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आदींना निमंत्रित करून मोठा गाजावाजा करत ते उरकले होते.त्याआधी ‘गावकरी’ सह विविध माध्यमांनी वेळोवेळी या शहर पोलिस ठाण्याचे इंग्रज कालीन इमारतीची आणि पोलिस वसाहतीची दयनीय स्थिती मालिकेद्वारे मांडली होती.त्यावेळी संबंधित मंत्र्यांना आ.आशुतोष काळे यांनी नूतन शहर इमारतीतून पोलिस वसाहतीची दयनीय स्थितीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खिडकीतून (विशेष) दर्शन घडवले होते.त्याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री वळसे पाटील यांनी या कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याची व पोलिस वसाहतीची नवीन इमारतीसाठी २८ कोटींचा निधी मंजूर केला होता.त्यात ०६ कोटींची प्रशासकीय इमारत व बाकी १९ कोटी रुपयांसाठी पोलिस वसाहतीसाठी निधी मंजूर केला होता.त्याची निविदा प्रसिद्ध होऊन सदर काम गेल्यावर्षी पूर्ण झाले आहे.सदर काम हे संगमनेर येथील के.के.जी.कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले होते.त्यांनी पोलिस ठाण्याची प्रशासकीय इमारत व दोन पोलिस वसाहतीच्या इमारतींचे काम वेळेत म्हणजेच २४ एप्रिल २०२४ रोजी पूर्ण केले होते.मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुका त्या पाठोपाठ नगरपरिषद निवडणुकांचा हंगाम सुरू झाला होता.त्यामुळे या इमारतीच्या उद्घाटनाचे काम करण्यास कोणालाही सवड मिळत नव्हती.

नूतन कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे इमारतीची उद्घाटन पूर्व पाहणी करताना शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी व त्यांचे सहकारी पाहणी करतानाचा क्षण.
दरम्यान त्याबाबत आमच्या प्रतिनिधीने मागील १५ जानेवारी रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.त्यात आ.आशुतोष काळे यांचेशी संपर्क साधून त्यांची भूमिका आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतली होती.त्यात त्यांनी आगामी सप्ताहात आपण वरिष्ठ मंत्र्यांना वेळ मिळाला नाही तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे हस्ते सदर इमारतीचे उद्घाटन करणार असल्याचे सुतोवाच केले होते. तो शब्द खरा होताना दिसत आहे.त्यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचेशी संपर्क साधून आगामी सोमवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर इमारतीचे उद्घाटन करणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आदींनी समाधान व्यक्त केले आहे.



