कोपरगाव शहर वृत्त
स्मार्ट सिटीला विरोध केल्याने ती दुसऱ्या तालुक्यात गेली-…यांचा आरोप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात प्रस्तावित असलेल्या स्मार्टसिटी प्रकल्पाला तत्कालीन काळात आ.काळे यांनी तीव्र विरोध केल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील १० ते १५ हजार युवकांना रोजगाराची संधी तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही,प्रक्रिया उद्योगाला गती मिळाली नसल्याचा आरोप सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांनव्ये केला आहे.

“कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत काळ्या असलेल्या कंत्राटदारांना आ.काळे यांचे पाठबळ असून हा प्रकार शहरातील नागरिकांच्या लक्षात आल्यामुळे सुज्ञ मतदारांनी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत योग्य कौल देत त्यांचा हा खेळ उधळून लावला आहे व आमचे नगरसेवक निवडून दिले आहे”-विवेक कोल्हे,अध्यक्ष,सहकार महर्षी कोल्हे कारखाना.
नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग असून 710 किलो मीटर पेक्षा मोठा आहे.मुंबई ते नागपूरला असा हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणारा असून 390 गावांमधून जात आहे.समृद्धी महामार्ग हा भविष्यात मोठा गेम चेंजर ठरणार आहे.समृद्धी महामार्गालगत अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहिर,धोत्रेसह महाराष्ट्रात16 ठिकाणी स्मार्ट सिटी उभारल्या जाणार होत्या.मात्र कोपरगाव तालुक्यातील आ.आशुतोष काळे यांनी विरोध केल्याने ती सावळी विहीर या ठिकाणी गेली आहे.सन-2019 च्या विधानसभा निवडणुकीत यावर मोठे रणकंदन झाले होते.कोल्हे गटाचा पराभव झाला होता.या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी हा आरोप केला आहे.या पार्श्वभूमीवर नगरपरिषद निवडणुकीत कोल्हे गटाने बहुमतासह विजय मिळवल्याने त्यांचा त्यांचे धारणगाव,ब्राह्मणगाव,खिर्डी गणेश,येसगाव,नाटेगाव येथील समर्थकांनी सत्काराचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी रेणुका कोल्हे,कोपरगाव नगरपरिषदेचे नवनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान,उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,गटनेते प्रसाद आढाव तसेच भाजपा,आरपीआय मित्रपक्ष लोकसेवा आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सतीश देवकर आदीसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”सोनेवाडी येथे शेतकऱ्यांची एकही गुंठा जमीन न घेता शेती महामंडळाच्या ५०० एकर जागेवर औद्योगिक वसाहत मंजूर झाली असून,त्यातील २५० एकर कोपरगाव तर २५० एकर राहाता तालुक्यातील आहे.मात्र या एमआयडीसीचा उल्लेख ‘शिर्डी एमआयडीसी’ असा होत असून ‘शिर्डी-कोपरगाव एमआयडीसी’ असा संयुक्त उल्लेख होणे गरजेचे आहे.तसेच भरती प्रक्रियेत कोपरगाव तालुक्याला कमी प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”निकृष्ट कामामुळे काळ्या यादीत असलेल्या कंत्राटदारांना आ.काळे यांचे पाठबळ आहे.हा प्रकार शहरातील नागरिकांच्या लक्षात आल्यामुळे सुज्ञ मतदारांनी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत योग्य कौल देत त्यांचा हा खेळ उधळून लावला.आमचे नगरसेवक निवडून दिले गेले असून,जे निवडून आले नाहीत ते देखील सकारात्मक काम करत आहेत.कोपरगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टी व कोल्हे गट हे सर्वात मोठे राजकीय घटक असून,सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यात एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जोमाने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मागील नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुकांमध्येही ‘गुलाल’ घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.



