जाहिरात-9423439946
सामाजिक उपक्रम

…या ग्रामपंचायतीत रक्तदान शिबिर संपन्न!

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

  ‘जीवनदान महाकुंभ-२०२६’ अभियान अंतर्गत जगद्‌गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान संवत्सर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज संवत्सर या ठिकाणी रक्तदान शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले आहे.त्याला संवत्सर,दहीगाव बोलका,वारी,कान्हेगाव आणि परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

संवत्सर या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले तो क्षण.

‘जीवनदान महाकुंभ-२०२६’ अभियान अंतर्गत जगद्‌गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान अंतर्गत संपूर्ण भारतभर ४ ते १८ जानेवारी या कालावधीत सुरू असलेल्या जीवनदान महाकुंभ सुरू असून त्या अंतर्गत संवत्सर येथे हा उपक्रम आज सकाळी संपन्न झाला आहे.यावेळी जवळपास १०० रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला आहे.

कोपरगाव तालुक्यात जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान,नाणीजधाम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जीवनदान महाकुंभ – २०२६’  अभियान अंतर्गत जगद्‌गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान संवत्सर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज संवत्सर येथे पहिले रक्तदान शिबिर  मोठ्या उत्साहात पार पडले आहे.संपूर्ण भारतभर ४ ते १८ जानेवारी या कालावधीत सुरू असलेल्या जीवनदान महाकुंभ सुरू असून त्या अंतर्गत संवत्सर येथे हा उपक्रम आज सकाळी संपन्न झाला आहे.यावेळी जवळपास १०० रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला असल्याची माहिती संवत्सर येथील सेवाध्यक्ष विजय आगवन यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करताना राजेश परजणे व अन्य मान्यवर.

सदर प्रसंगी गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संवत्सर ग्रामपंचायतच्या सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे, ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा अहिरे आदींसह वैद्यकीय अधिकारी,जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे सेवेकरी,डॉक्टर,रक्तदाते बहुसंख्येने उपस्थित होते.

या शिबिरासाठी नरेंद्र महाराज ट्रस्टचे कोपरगाव तालुकाध्यक्ष महेंद्र सिनगर,महिला तालुकाध्यक्षा उज्ज्वला कोल्हे,दत्तात्रय बारसे,गुरुसेवक सोनाली जाधव,संवत्सर सेवाध्यक्ष विजय आगवन,संजय भाकरे,संदिप दीक्षित,सुरेखा शिंदे,राहुल शिंदे,दिनेश जाधव,अशोक देसाई,मंदाकिनी टिळेकर,छाया भारती,सुमित पारधी,सागर लाड,चंद्रकला पाबळे आदीसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close