निधन वार्ता
सागर शिंदे यांना पितृशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील रहिवासी व सुदेश टॉकीज समोर असलेले सेतू चालक सागर लक्ष्मण शिंदे यांचे पिताश्री लक्ष्मण बगाजी शिंदे (वय-८२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील गोदातीरी अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.लक्ष्मण बगाजी शिंदेयांचे छायाचित्र.
स्व.लक्ष्मण बगाजी शिंदे हे अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले यांचे विचाराने प्रेरित होऊन व त्यांचे अनुयायी म्हणून अनेक वर्षे काम केले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,नगराध्यक्ष पराग संधान आदींनी दुःख व्यक्त केले आहे.ते गणेश शिंदे यांचे पिताश्री होते.


