निधन वार्ता
विठ्ठलराव पोकळे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव पुंजा पोकळे (वय -८२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांचे पश्चात दोन भाऊ,पत्नी,एक मुलगा,सून,नातवंडे आदी परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.विठ्ठलराव पोकळे हे अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाचे म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होते.ते महावितरण कंपनीचे सेवानिवृत तार तंत्री मारुतराव पोकळे यांचे जेष्ठ बंधू तर अरुण पोकळे यांचे पिताश्री होते.त्यांच्यावर जवळके येथे ग्रामपंचायत अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,माजी सरपंच लताबाई परसराम पोकळे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.


