कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात आढळले तीन संशयित रुग्ण
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे आणखी तीन संशयित रुग्ण आढळून आले असून हे तीन जण पाथरे ता.सिन्नर येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते.त्यांचे अहवाल पुण्याला पाठविण्यात आले आहेत.मात्र त्यांचे अहवाल प्रतीक्षेत असून आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील रुग्णांचा अहवाल निरंक आला आला असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोरोना साथीने दोन महिलांचे निधन झाल्याची घटना ताजी असताना मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत अजून तीन संशयित रुग्ण आढळून आले आहे.नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्णांनी आपला प्राण सोडला आहे.तथापि ताज्या माहिती नुसार कोपरगाव शहरातील रुग्णांचा अहवाल नकारात्मक आला आहे.आता केवळ कोपरगाव तालुक्यातील या तीन रुग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.तो उद्या येण्याची शक्यता आहे.त्याकडे कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५३ ने वाढून ती १७ हजार ३५७ इतकी झाली असून ५६० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४ हजार २०० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २२३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.कोपरगावात लक्ष्मीनगर या उपनगरात एक साठ वर्षीय महिलेचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे. त्या पाठोपाठ शिंगणापूर येथील एका महिलेचे सारी आजाराने निधन झाल्याची घटना ताजी असताना मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत अजून तीन संशयित रुग्ण आढळून आले आहे.नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्णांनी आपला प्राण सोडला आहे.तथापि ताज्या माहिती नुसार कोपरगाव शहरातील रुग्णांचा अहवाल नकारात्मक आला आहे.आता केवळ कोपरगाव तालुक्यातील या तीन रुग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.तो उद्या येण्याची शक्यता आहे.हे तिन्ही रुग्ण पाथरे येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.आता यांच्या अहवालाकडे कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.या आधी लक्ष्मीनगरात मयत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अठरा रुग्णांना कोपरगाव येथील हॉटेल स्पॅन येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.