निधन वार्ता
आप्पासाहेब आबक यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील शेतकरी कुटुंबातील रहिवासी व छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक आप्पासाहेब शिवाजी आबक यांचे शुक्रवार दि.१६ जानेवारी रोजी सकाळी निधन झाले आहे.मृत्यूसमयी ते ६९ वर्षांचे होते.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.आप्पासाहेब आबक हे गौतम बँकेचे माजी संचालक कारभारी बंडू आबक यांचे पुतणे तर ह.भ.प.शिवाजीराव आबक यांचे चिरंजीव तसेच राजेंद्र व संजय आबक यांचे ते बंधू होते.त्यांच्या पश्चात पत्नी,शार्दुल व इतर दोन अशी तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
स्व.आप्पासाहेब आबक हे छत्रपती संभाजीनगर येथे उद्योग व्यवसाय करीत होते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपला उद्योग सुरु करुन तो यशस्वी करून दाखविला. मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.संवत्सर येथे शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.संवत्सर पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.
दरम्यान त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, उपसरपंच विवेक परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले यांनी कै.आबक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे व आबक परिवाराचे सांत्वन केले आहे.


