साहित्य व संस्कृती
पित्याच्या ‘वर्षश्राद्धाच्या’ च्या दिवशी ‘ बाप’ प्रकाशित!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कुटुंबाचा मुख्य आधार बाप असतो.बाप कधी व्यक्त होत नाही.बाप कधी रडत नाही म्हणून बापाला वेदनाच नसतात असाच सर्वांचा समज झालेला आपण पाहतो.आईवर आजपर्यंत खूप लिखाण झाले.त्यातून ती घराघरात पोहोचली.मात्र कायम उपेक्षित राहिला आहे.बाप शिस्त लावणारा म्हणून तो कठोर वाटतो पण बापालाही एक हळवं मन असतं,तोही त्याग-समर्पण करतो,त्यालाही भावना असतात हे समाजासमोर आणण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारी शिक्षिका विजया विठ्ठल जाधव यांनी ‘बाप’ या काव्यसंग्रहातून करून आपल्या वडिलांना वर्षश्राद्धाच्या निमित्ताने जगावेगळी आदरांजली अर्पण केली आहे.

“आईचं काळीज समजणार्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही.आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा,जबाबदारीचे ओझे घेऊन धावणार्या बापाने अजून जोरात पळायला हवे,असे प्रत्येक मुलाला नेहमी वाटत असते.पण जेव्हा तो स्वतः पळायला लागतो,तेव्हा जीवघेण्या शर्यतीचे नियम समजतात.प्रवास झाल्याशिवाय जगणं समजत नाही आणि दुसर्याची बाजूही कळत नाही हेच खरे.
आईचं काळीज समजणार्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही.आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा,जबाबदारीचे ओझे घेऊन धावणार्या बापाने अजून जोरात पळायला हवे,असे प्रत्येक मुलाला नेहमी वाटत असते.पण जेव्हा तो स्वतः पळायला लागतो,तेव्हा जीवघेण्या शर्यतीचे नियम समजतात.प्रवास झाल्याशिवाय जगणं समजत नाही आणि दुसर्याची बाजूही कळत नाही.बऱ्याच जणांना याचा आयुष्याच्या वाटेवर अनुभव येतो.मात्र बापाची किंमत तेंव्हाच समजते जेव्हा तो बाप होतो.बाप विषयावर फार कमी जणांनी लिहिले बोलले असेल मंत्री उणीव कुंभारी येथील जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षिका विजया जाधव यांनी भरून काढली असल्याचे दिसून येत आहे.त्यांनी आपल्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथील स्व.विठ्ठल बाबुराव जाधव या बापाच्या पहिल्या वर्ष श्राद्धाच्या’ दिवशी ‘बाप’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन उद्धव महाराज मंडलिक,माजी खा.प्रसाद तनपुरे,शंभूगिरी महाराज गोसावी,लक्ष्मण महाराज चौगुले,श्री.निमसे सर,कराड सर,कोहकडे सर,ठाकरे सर,गुंजाळ सर,रामदास जाधव,पवार बाई,सुमन विठ्ठल जाधव यांच्या हस्ते अत्यंत श्रद्धामय व भावनिक वातावरणात करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,शिक्षकवर्ग,सामाजिक कार्यकर्ते,ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर काव्य संग्रहाविषयी बोलताना मान्यवरांनी सांगितले की,”आई सारखेच बापाचेही कर्तृत्व,वेदना,भावना समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.’बाप’ या विषयावर साहित्यनिर्मिती होणे सामाजिक गरज आहे.या काव्यसंग्रहातील कविता प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणार्या तसेच बापाच्या जीवनातील विविध अनुभवांची मांडणी करणार्या आहेत.या कविता वाचकांना भावनिक करून अंतर्मुख करणार्या तसेच बापाच्या भूमिकेचे वास्तव समाजासमोर आणणार्या असल्याचे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान हा काव्यसंग्रह साहित्यक्षेत्रात नक्कीच वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.उपस्थितीतांनी विजया जाधव यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



