जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील ..त्या एक रुग्णाचा अहवाल प्रतीक्षेत !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आढळून आला असून त्यांचे अहवाल पुण्याला पाठविण्यात आले आहेत.मात्र त्यांचे अहवाल प्रतीक्षेत असून आज उशिराने मिळालेल्या माहितीनुसार करंजी येथील रुग्णाचा अहवाल नकारात्मक आला आहे तर कोपरगावातील लक्ष्मीनगर येथील एका संशयित रुग्णांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगावात लक्ष्मीनगर या उपनगरात एक साठ वर्षीय महिलेचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे. त्या पाठोपाठ शिंगणापूर येथील एका महिलेचे सारी आजाराने निधन झाल्याची घटना ताजी असताना अजून दोन संशयित रुग्ण आढळून आला आहे.नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्णांनी आपला प्राण सोडला आहे.त्यात करंजी ग्रामपंचायत हद्दीतील एक व दुसरा एक कोपरगाव लक्ष्मीनगर या उपनगरातील आहे.तथापि ताज्या माहिती नुसार करंजी येथील रुग्णांचा अहवाल नकारात्मक आला आहे.आता केवळ कोपरगावातील रुग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४०५ ने वाढून ती १६ हजार १२८ इतकी झाली असून ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ३ हजार ६४८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २११ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २८ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.कोपरगावात लक्ष्मीनगर या उपनगरात एक साठ वर्षीय महिलेचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे. त्या पाठोपाठ शिंगणापूर येथील एका महिलेचे सारी आजाराने निधन झाल्याची घटना ताजी असताना अजून दोन संशयित रुग्ण आढळून आला आहे.नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्णांनी आपला प्राण सोडला आहे.त्यात करंजी ग्रामपंचायत हद्दीतील एक व दुसरा एक कोपरगाव लक्ष्मीनगर या उपनगरातील आहे.तथापि ताज्या माहिती नुसार करंजी येथील रुग्णांचा अहवाल नकारात्मक आला आहे.आता केवळ कोपरगावातील रुग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.तो उद्या येण्याची शक्यता आहे.त्याकडे कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close