न्यायिक वृत्त
…या संघटनेच्यां नेत्यांसह कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांचेसह जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आ.बच्चू कडू यांचेवर नऊ वर्षापूर्वी एका आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले होते.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न होऊन त्यांना श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचें न्या.सिद्धार्थ साळवे यांनी त्यांच्यासह 17 प्रमुख आरोपींसह जवळपास शंभर जणांना निर्दोष मुक्त केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रूपेंद्र काले यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

दरम्यान याबाबत जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या निकालाचे सर्वत्र स्वागत होत असून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.सिद्धार्थ साळवे यांचे आभार व्यक्त केले आहे.सदर खटला चालविण्यासाठी श्रीरामपूर बारचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.संदीप चोरमल, ॲड.बाबासाहेब मुठे,ॲड सर्जेराव घोडे,ॲड.प्रशांत कापसे यांनी विना मोबदला आंदोलकांचे खटले चालविली होते.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”याबाबत सविस्तर वृत्त असे की,”सन- 2017 मध्ये रघुनाथ दादा पाटील व बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी तसेच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी सी.एम.नागपूर (फडणवीस) टु.पी.एम.वडनगर गुजरात (मोदी) अशी आसूड यात्रा आयोजित केली होती.त्यातून शेतकऱ्यांत जनजागृती करणे अपेक्षित होते.संबंधित यात्रा जिल्हाध्यक्ष अनिल औताडे व तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांनी श्रीरामपूर येथेल आझाद मैदान येथे आयोजित केली होती.सदर कार्यक्रमांमध्ये एन.डी.शाखेच्या शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यामुळे आदल्या दिवशी यांनी शाखेच्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या समवेत मुठे वाडगावच्या शेतकऱ्यांनी वडाळा पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन पाणी न मिळाल्यामुळे पाणी देण्याची जोरदार मागणी केली होती.

शेतकरी संघटनेने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सी.एम.टू.पी.एम.यात्रा आयोजित केली होती.सदर कार्यक्रम आटोपल्यानंतर श्रीरामपूर येथून ‘आसूड यात्रा’ कोपरगावच्या दिशेने जाणार होती.त्यामुळे सदर यात्रा वडाळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोरून गेली असता अज्ञात लोकांनी कार्यालयावर आंदोलन केले.परंतु पोलीस प्रशासनाने संघर्ष यात्रेतील नेते आयोजक व निवेदन दिलेल्या शेतकऱ्यांवर पाणी न देता खोटे गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान याप्रकरणी दुसऱ्या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांमध्ये ‘पेटून घेऊ अथवा पेटून देऊ’अशा आशयाचे पहिल्या पानावर मथळे छापून आले होते.सदर वर्तमानपत्राच्या बातम्या वाचून रघुनाथ दादा पाटील व बच्चु कडू आदी नेते संतापले होते.सदर कार्यक्रम आटोपल्यानंतर श्रीरामपूर येथून ‘आसूड यात्रा’ कोपरगावच्या दिशेने जाणार होती.दरम्यान रूपेंद्र काले यांच्या संकेत नर्सरीवर वाकडी फाटा येथे भोजनासाठी व्यवस्था केली होती.त्यामुळे सदर यात्रा वडाळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोरून गेली असता अज्ञात लोकांनी कार्यालयावर आंदोलन केले.परंतु पोलीस प्रशासनाने संघर्ष यात्रेतील नेते आयोजक व निवेदन दिलेल्या शेतकऱ्यांवर पाणी न देता खोटे गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान याप्रकरणी शेतकरी नेत्याना दोषी धरून शेतकरी नेत्यांवर श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासले असा आरोप करून अधिकाऱ्यांनी या प्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्याचेवर भारतीय दंड विधान कलम ३५३,१४३,१४७,१४९व ४२७ अन्वय गुन्हे दाखल झाले होते.त्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांचेसह जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आ.बच्चू कडू यांचेसह शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट,राज्य सचिव रुपेंद्र काले,शेतकरी संघटनेचे माजी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पटारे,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष अजय बारस्कर,तालुकाध्यक्ष युवराज जगताप,विलास कदम सह डॉ.शंकर मुठे,भाऊसाहेब मुठे,शिवाजी मुठे,भिकचंद मुठे,चांगदेव मुठे,रमेश मुठे,रघुनाथ मुठे पाराजी शिंदे,भास्कर शिंदे बरोबर इतर शंभर शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
दरम्यान या प्रकरणी न्यायालयात सात वर्ष सरकारने खटला चालवून त्या प्रकरणी सुनावणी सुरू होती.अखेर श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचें न्या.सिद्धार्थ साळवे यांनी नऊ वर्षांपूर्वी दाखल झालेला खटला काल निकाली काढून सर्व आंदोलक नेत्यांची व शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
दरम्यान याबाबत न्यायालयाच्या निकालाचे सर्वत्र स्वागत होत असून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.सिद्धार्थ साळवे यांचे आभार व्यक्त केले आहे.सदर खटला चालविण्यासाठी श्रीरामपूर बारचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.संदीप चोरमल, ॲड.बाबासाहेब मुठे,ॲड सर्जेराव घोडे,ॲड. प्रशांत कापसे यांनी विना मोबदला आंदोलकांचे खटले चालविली होते.त्यांचेही शेतकरी संघटना,जनशक्ती पक्ष आदींसह शेतकऱ्यांनी स्वागत करून आभार मानले आहे.



