शैक्षणिक
…या शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दिपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुणे येथे दरवर्षी राज्यस्तरीय अभिरुप संसदेचे आयोजन केले जात असून यावर्षी अहिल्यानगर व नाशिक या ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेऱ्यांमधून आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयमच्या अभिजित जांभाळकर व श्रेयस भवर या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या वर्षीच्या प्राथमिक फेरीमध्ये महाराष्ट्रातील ३०० शाळांमधील १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.प्राथमिक फेरीमध्ये लेखी परीक्षा,भाषा कौशल्य व मुलाखत यामधून पुणे येथे होणाऱ्या अभिरुप संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी या विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड झाली आहे.
दिपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुणे येथे दरवर्षी राज्यस्तरीय अभिरुप संसदेचे आयोजन केले जाते.या संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ ते ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे.
या वर्षीच्या प्राथमिक फेरीमध्ये महाराष्ट्रातील ३०० शाळांमधील १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.प्राथमिक फेरीमध्ये लेखी परीक्षा,भाषा कौशल्य व मुलाखत यामधून पुणे येथे होणाऱ्या अभिरुप संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड होते.त्यात ही निवड संपन्न झाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे,विभाग प्रमुख अनिल सोनवणे,सचिन डांगे,पर्यवेक्षक नयना आदमाने,गणेश रासने,विषय शिक्षक राजेंद्र जाधव,वैभव हारदे यांचे मार्गदर्शन लाभले होते.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठल होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,प्राचार्य निरंजन डांगे यांनी अभिनंदन केले आहे.



