जाहिरात-9423439946
ग्रामविकास

…या गावी पंचायतराज अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   जवळके ग्रामपंचायत व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने आज जवळके हनुमान मंदिर सभामंडप या ठिकाणी डोळ्यांच्या रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते.त्याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याची माहिती सरपंच सारिका विजय थोरात यांनी दिली आहे.

जवळके ग्रामपंचायत व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल याचे संयुक्त विद्यमाने आज नेत्ररोग मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न झाले आहे.

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा हेतू हा विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करण्यासह योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे,लोकांचे जीवनमान उंचावणे असा आहे”-पराशरम हासे,ग्रामपंचायत अधिकारी,जवळके ग्रामपंचायत.

    राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे.यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे,त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे,शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे,योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे,ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे,आरोग्य,शिक्षण, उपजीविका,सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे,यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे.कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीने यात सहभाग नोंदवला असून आपली विविध कामे मोठ्या उत्साहात सुरू केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज जवळके ग्रामपंचायत व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल याचे संयुक्त विद्यमाने आज नेत्ररोग मोफत वैद्यकीय तपासणी करण्याचे शिबिर आयोजित केले होते.त्याला ग्रामस्थानी चांगला प्रतिसाद दिला आहे.

   सदर प्रसंगी पत्रकार नानासाहेब जवरे,ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,माजी उपसरपंच विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ.हर्षल पाठक,सामाजिक कार्यकर्ते कैलास भड,दत्तात्रय वाकचौरे,संतू पाटील थोरात,त्र्यंबक दरेकर,जवळके ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे,पोपट थोरात तुलसी आय हॉस्पिटलचे कर्मचारी आदींसह मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  त्यावेळी नानासाहेब जवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे की,”मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा हेतू हा विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी करण्यासह योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे असा आहे.याशिवाय लोकांचे जीवनमान उंचावणे नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणेसह आरोग्य,शिक्षण,उपजीविका,सामाजिक न्याय यामध्ये काम करणे असा आहे.त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच सारिका विजय थोरात या आपल्या सहकाऱ्यांना घेऊन चांगले काम करत आहे.त्यांनी वाजवा अनेक उपक्रम राबवले असून त्यात त्यांना निधी आणण्यात मोठे यश मिळाले आहे.

   सदर प्रसंगी प्रास्तविक जवळके ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी परशराम हासे यांनी केले आहे.याशिवाय उपस्थिताचे आभार वनिता रखमा वाकचौरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close