क्रीडा विभाग
…या विद्यार्थ्याची राष्ट्रीय रग्बी संघात निवड !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या कोकमठाण हद्दीतील समता इंटरनॅशनल स्कूलचा खेळाडू सत्यजित संभाजी कार्ले याची महाराष्ट्र रग्बी संघात निवड होऊन तो आता ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका स्वाती कोयटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या यशात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते सत्यजित कार्लेच्या सातत्यपूर्ण,आक्रमक व नेतृत्वगुणांनी परिपूर्ण खेळाने त्याची थेट महाराष्ट्र रग्बी संघात निवड झाली असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय १७ व १९ वर्षांखालील रग्बी स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत ही लक्षवेधी कामगिरी केली आहे.पहिल्या सामन्यात नागपूर विभागावर मात,त्यानंतर नाशिक विभागावर विजय मिळवत संघाने अंतिम फेरी गाठली आहे.अंतिम सामन्यात पुणे विभागाने द्वितीय क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या यशात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते सत्यजित कार्लेच्या सातत्यपूर्ण,आक्रमक व नेतृत्वगुणांनी परिपूर्ण खेळाने,उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची थेट महाराष्ट्र रग्बी संघात निवड झाली असून,हे समता इंटरनॅशनल स्कूलसाठी अभिमानास्पद यश मानले जात आहे.
दरम्यान सत्यजित कार्ले याला क्रीडा विभाग प्रमुख रोहित महाले आणि रग्बी प्रशिक्षक सुनील चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.त्याच्या या यशाचे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे,संदीप कोयटे आदींनी अभिनंदन केले आहे.दरम्यान या यशाबद्दल संस्थापक ओमप्रकाश कोयटे व सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते सत्यजितचा कार्ले याचा सत्कार करण्यात आला आहे.



