क्रीडा विभाग
…या खेळाडूची राज्याच्या क्रिकेट संघात निवड!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवुन पुणे येथील महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय यांनी जाहीर केलेल्या १४ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात अरमान पठाणची निवड झाली आहे.त्या बदल नुकत्याच कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्याचा सत्कार करुन त्याला शुभेच्छा देण्यातआल्या आहे.


अरमान पठाण याचे या यशाबद्दल कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रसाद नाईक,डॉ.अजेय गर्जे,डॉ.दिपक नाईकवाडे,खजिनदार राजेंद्र होन,पवन शिंदे,महेश आमले,अड.राजेंद्र जाधव,राजेंद्र लहीरे,ओकांर भागवत आदीनी अभिनंदन केले आहे.
आगामी डिसेंबर महिन्यात राजस्थान मधील सिकर येथे होणाऱ्या ६९ वी राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघात कोपरगाव येथील रहिवासी विद्यार्थी अरमान पठाण यांची चौदा वर्षाखाली ल संघात निवड करण्यात आली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव येथील क्रिकेट असोसिएशनने त्यांचा सत्कार आयोजित केला होता.या वेळी असोसिएशनचे सचिव मनोज कपोते यांनी आरमानच्या निवडीचे कौतुक केले व हा खेळाडू आपले भविष्यातील स्वप्न पुर्ण करील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तर असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी आरमान पठाणची राष्ट्रीय स्पर्धा तील निवड शालेय स्पर्धा तील सर्वोच्च कामगिरी आहे.या निवडीमुळे कोपरगावच्या तंत्रशुध्द क्रिकेट चा दर्जा सुधारला आहे असे स्पष्ट केले असल्याचे सांगून “अजिंक्य रहाणे आणि जहीर खान यांनी आपल्या गावाचे नाव क्रिकेट विश्वात जसे मोठे केले,तसेच अरमान पठाण देखील कोपरगावचे नाव देशभर मोठे करेन याची खात्री आहे.शालेय पातळीवरील निवड ही सोपी नसते; त्यासाठी कठोर मेहनत,निष्ठा याची सातत्याने गरज असते.अरमानने ही किमया साधली आहे.

दरम्यान या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अरमान पठाण म्हणाला की,“महाराष्ट्रासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते.मला ही संधी दिल्याबद्दल प्रशिक्षकांचे व माझ्या कुटुंबाचे आपण आभार मानतो.राष्ट्रीय पातळीवर संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल”आगामी डिसेंबर महिन्यात सिकर (राजस्थान) येथे होणाऱ्या ६९ वी राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघात अरमानकडून फलंदाजीतील भक्कम योगदानाची अपेक्षा आहे.
यावेळी रिजवान पठाण यांनी प्रास्ताविक केले.तर इम्रान पठाण यांनी आभार मानले आहे.



