धार्मिक
… या ठिकाणी दत्त जयंती उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या श्री दत्त जयंती या स्थानिक उत्सवा निमित्त साईबाबा समाधी मंदिर,श्री दत्त मंदीर व मंदीर परिसरात साईभक्त श्रीमती रजनी डांग यांच्या देणगीतुन करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे.

दरम्यान आज रात्रौ ०९.१५ वा.श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.आज गुरुवार असल्याने नित्याचे चावडी पुजन होईल व श्रींची शेजारती रात्रौ १०.३० वा. (पालखी मिरवणूक परत आल्यानंतर) होणार आहे.
दरम्यान आज सायं. ०४ ते ०६ यावेळेत श्री दत्तजयंती निमित्त मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर ह.भ.प.स्नेहल संजय कुलकर्णी,नाशिक यांचा कीर्तन कार्यक्रम व श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यातआला आहे.तर सायं. ०६ वाजता श्रींची धुपारती होईल.त्यानंतर लेंडीबागेतील श्री दत्त मंदिरात श्रीदत्त मुर्तीवर व पादुकांवर अभिषेक पुजा व श्रीदत्तात्रयांची आरती करण्यात येईल.

याशिवाय रात्रौ ०९.१५ वा.श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.आज गुरुवार असल्याने नित्याचे चावडी पुजन होईल व श्रींची शेजारती रात्रौ १०.३० वा. (पालखी मिरवणूक परत आल्यानंतर) होणार आहे. असल्याची माहिती संस्थांनच्या वतीने देण्यात आली आहे.



