निवडणूक
…या नगरपरिषदेत पुन्हा एकदा साजरा होणार शिमगा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावसह १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या असल्याची माहिती आताच हाती आली असून कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक अधिनियम १९६६ च्या १७ (१)(ब) नुसार माघारीला पुरेसा वेळ न मिळाल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशावरून कोपरगाव नगरपरिषदेची फेर निवडणूक ०४ डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सागरे यांनी रात्री उशिरा दिली आहे.त्यामुळे सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते,उमेदवार यांना निवडणुकीचा सामना करावा लागणार असल्याचे उघड झाल्याने मोठा मनस्ताप होणार आहे.

कोपरगाव नगरपरिषद निवडणूक पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आगामी ०४ डिसेंबर रोजी जाहीर करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी जाहीर केल्याने शहरात मोठा पेच निर्माण झाला आहे.यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांची ऐन हिवाळ्यात होळी होणार असल्याचे सरळ सरळ दिसत आहे.
महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.०२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.दुसऱ्या दिवशीच म्हणजे ०३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.०४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.अशातच राज्यात ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषदाच्या अध्यक्षपदावरून आक्षेप आहे त्या ठिकाणी सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ पैकी ०४ नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं २९ नोव्हेंबर रोजी दिली होती.व ज्या नगरपरिषदांमध्ये न्यायालयात अपील करण्यात आले होते.त्या ठिकाणी उमेदवारांना माघारीला तीन दिवसांचा पुरेसा कालावधी न मिळाल्याने त्या ठिकाणी फेर निवडणूक घेण्याचे आदेश आयोगाने दिले होते त्यात कोपरगाव नगरपरिषदेचा समावेश होता.त्यातच कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्या विरोधात २१ नोव्हेंबर रोजी माजी आ.काळे गटाच्या ३१ उमेदवारांना अपात्र करण्याबाबत एक अपील माजी आ.कोल्हे गटाकडून करण्यात आले होते.त्याचा निकाल २५ नोव्हेंबर रोजी लागला होता.व सदर मागणी त्यात सपशेल फेटाळली होती.दरम्यान कोपरगावसह अशा जिल्ह्यात चार नगरपरिषदा आढळून आल्या होत्या अशा ठिकाणी फेर निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर रोजी दिले आहेत.त्यामुळे त्याचा मोठा फटका कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीला बसला असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान त्यामुळे कोपरगाव नगरपरिषद निवडणुक अधिकारी भारती सागरे यांनी रात्री उशिराने पत्रकार परिषद घेऊन कोपरगाव नगरपरिषद निवडणूक पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आगामी ०४ डिसेंबर रोजी जाहीर करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी जाहीर केल्याने शहरात मोठा पेच निर्माण झाला आहे.यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांची ऐन हिवाळ्यात होळी होणार असल्याचे सरळ सरळ दिसत आहे.पुन्हा एकदा गाड्या,बॅनर,भोंगे,प्रसिद्धी साहित्य,वेळ,कार्यकर्त्यांची मेजवानी,(मोठ्या नेत्यांच्या सभेच्या उपस्थितीचा रोजगार) आदीचा खर्च अंगावर घ्यावा लागणार आहे.त्यामुळे हे दुबळे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते या निवडणुकीत खरेच टिकणार का असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.



