कोपरगाव तालुका
..या गावात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील संजयनगर या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सध्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या संकटामूळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अवघ्या चार व्यक्तीनी उपस्थित राहून साजरी केली आहे.
डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर, हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.
सदर प्रसंगी आर.पी.आय. सचिव दिपक गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.तसेच रमाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना गायकवाड यांनी सांगितले की शासनाचा आदेशाचे पालन करून लोकांनी गर्दी न करता घरीच पुजा करावी. तसेच लोकांना आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी भास्कर वाकूड,बाबूराव काकडे, पांडूरंग खरात,आदी मान्यवर उपस्थित होते .