जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या गावात शेती महामंडळाच्या जागेत घरकुले मंजूर

न्यूजसेवा

संवत्सर (प्रतिनिधी)

  कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या पाच हेक्टर जागेवर बेघर कुटुंबांना घरकुले बांधून देण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

“संवत्सर गावच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण रुग्णालय शृंगऋषीसाठी व वर्ग देवस्थान रस्त्याचे काम माननीय नामदार विखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेश परजणे यांच्या प्रयत्नाने संवत्सर गावचा विकासासाठी सुमारे ७० कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.सदर निधीमुळे मुलभुत सुविधा निर्माण करुन देण्यात आलेल्या आहे”-शालिनी विखे,माजी अध्यक्षा,जिल्हा परिषद,अहिल्यानगर.

   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रामवाडी या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने शेती महामंडळाच्या मंजूर शेत जमिनीत सुमारे ३० घरकुलांचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्सवात करण्यात आले आहे.

   सदर प्रसंगी नामदेवराव पा.परजणे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले उपसरपंच विवेक परजणे,गटविकास अधिकारी दळवी,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,पंडित वाघिरे,सतीश दिघे,श्री तोडले,वाघमारे, ग्रामविकास अधिकारी कृष्णदास आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

   याप्रसंगी शालिनी विखे म्हणाल्या की,”स्व.नामदेवराव परजणे यांचे स्वप्न आज बालदिनाच्या मुहुर्तावर जनसामान्यांच्या घरकुलाला पाच हेक्टर जागा देऊन पूर्ण केले आहे.सन- १९८५ पासून हा लढा सुरु होता.अखेर त्याला यश आले.आणि ते पण लोणी या ठिकाणी सिंधुताई विखे पाटील कॉलनी आहे त्या धरतीवर त्याचे बांधकाम होणार आहे या सर्व घरकुलांना महिलांचे नांव देण्यात यावे.संवत्सर परिसरातील लक्ष्मणवाडी,रामवाडी, दशरथवाडी,बिरोबा चौक या भागातील गरीब बेघर कुटुंबाना याचा लाभ होणार आहे.इतर भागातील लोकांना देखील लवकरच घरकुले बांधून देण्याबाबत प्रयत्न केला जाईल.संवत्सर गावच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण रुग्णालय शृंगऋषीसाठी व वर्ग देवस्थान रस्त्याचे काम माननीय नामदार विखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेश परजणे यांच्या प्रयत्नाने संवत्सर गावचा विकासासाठी सुमारे ७० कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.सदर निधीमुळे मुलभुत सुविधा निर्माण करुन देण्यात आलेल्या आहे. ही एक आनंदाची बाब आहे. ना.विखे महसूलमंत्री असताना संवत्सर गांवासाठी महसूलच्या संबंधिातील अनेक विकासाचे कामे केली आहेत.राजेश परजणे कामाचा रेटा काम पूर्ण होईपर्यंत असतो.काम पूर्ण झाल्याशिवाय आबाला चैन पडत नाही. भविष्यामध्ये परजणे कुटुंबाने जे समाजासाठी काम केलेलं आहे कौतुकास्पद आहे ही जाणीव ठेवून भविष्यामध्ये एकजुटीने राजेश आबाच्या मागे भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन करुन त्यांनी जुन्या आठवणीला उजाळा दिला,राजेश परजणे,जिल्हा परिषद माजी सदस्य यांनी भूमिपूजन प्रसंगी गोरगरीब जनतेस घरकुल चांगल्या प्रतीचे मिळून ज्यांनी आपला आयुष्य झोपडी मध्ये काढले त्या लोकांना नवीन स्लॅब चे घर मिळणार आहे यासाठी १९९५ पासून शेती महामंडळाच्या जमिनी संवत्सर गावातील लोकांना घरासाठी शाळासाठी पाणी व्यवस्था साठी मिळावा त्यासाठी प्रयत्न चालू होते त्या प्रयत्नास माननीय नामदार विखे साहेब यांनी शासनाकडून गावठाणास जमिनी दिल्यामुळे आज त्या ठिकाणी घरकुल तयार होणार आहे त्याचबरोबर संवत्सरच्या विकासासाठी ६० कोटी रुपये दिल्यामुळे गावचा कायापालटच झालेला आहे. हे काम सोपे नव्हते पण इच्छाशक्ती असली की सगळे काही शक्य करता येते. संवत्सर ग्रामस्थांसाठी आम्ही रात्रंदिवस हजर आहोत.नामदेवराव परजणे आण्णांचे स्वप्न आम्ही पूर्ण करीत आहोत. यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व शालिनी विखे यांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत असते.ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो.असेही राजेश परजणे  यांनी शेवटी सांगितले.

याप्रसंगी उपसरपंच विवेक परजणे यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी आजचा दिवस हा सोनेरी अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे. गेल्या ३० वर्षापासूनचे आमचे स्वप्न राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली राजेश परजणे यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेले आहे. संवत्सर गांवाचा विकास हा आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.सर्वसामान्य जनतेच्या मुलभुत गरजा पूर्ण करण्याचे स्वप्न आम्ही जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतीच्या विकास निधीच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण करता आले याचे समाधान वाटते,यापुढेही आम्ही ग्रामस्थांच्या तळागाळातील गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन परजणे यांनी यावेळी केले.

  याप्रसंगी घरकुल लाभार्थी महिलांनी  शालिनी विखे पाटील माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संवत्सर गावातील चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मणराव परजणे,खंडू फेपाळे, दिलीपराव ढेपले,सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव साबळे,शिवाजी गायकवाड,संपत भारुड,वसंत शिंदे,तुषार बारहाते,अनिल आचारी,पोपटराव करपे,बाळासाहेब गायकवाड,दिलीप तिरमके,ज्ञानेश्वर कासार,तुषार कोदरे, बाळासाहेब दहे,परिमल कोदरे,राजेंद्र निकम आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी लक्ष्मणराव साबळे यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close