सहकार
…’या’ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने आपल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी मधुर करण्यासाठी त्यांना २० टक्के बोनस देण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केली आहे.याबाबत कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

…’तो’ विजय पुन्हा एकदा करायचा !
नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व गट-गणाचे आरक्षण जाहीर झालेले आहे.त्याप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष,नगराध्यक्ष,सभापतीचे आरक्षण जाहीर झालेले असून लवकरच निवडणूकांच्या तारखा जाहीर होतील.आजवर सर्वांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नातून आपण विजयश्री प्राप्त केली आहे.यापुढेही त्याच विजयाची पुनरावृत्ती करायची असल्याने आता त्यासाठी तयारीला लागा”-आ.आशुतोष काळे
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या वर्षाच्या ७१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचा आज उपाध्यक्ष प्रवीण शिंदे आणि त्यांच्या धर्मपत्नी गौरी शिंदे आदींच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आ.अशोक काळे हे होते.

याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते पद्माकांत कुदळे,ज्ञानदेव मांजरे,एम.टी.रोहमारे,बाबासाहेब कोते,संभाजी काळे,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे,राजेंद्र घुमरे,दिलीप बोरनारे,डॉ.मच्छिंद्र बर्डे,सचिन चांदगुडे,ॲड.राहुल रोहमारे,अनिल कदम,वसंतराव आभाळे,श्रीराम राजेभोसले,अशोक मवाळ,सुनील मांजरे,मनोज जगझाप,शंकर चव्हाण,इंदूबाई शिंदे,वत्सला जाधव,दिनार कुदळे,प्रशांत घुले,गंगाधर औताडे,श्रावण आसने,कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,गौतम बँकेचे अध्यक्ष संजय आगवण,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे,गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष गवळी,कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,आसवणी विभागाचे जनरल व्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव संदीप शिरसाठ, आदी प्रमुख मान्यवरांसह बहु संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,अधिमंडळाच्या सभेमध्ये ऊस दराबाबत सांगितल्याप्रमाणे अंतिम हप्ता रु.१५० प्र.मे.टन दस-याच्या दुस-याच दिवशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला आहे.कारखान्याची सातत्याने योग्य ऊस दर देण्याची परंपरा असून आजपर्यंत कारखाना कार्यक्षेत्र व गेटकेन असा कोणताही भेदभाव न करता सरसकट रु.३ हजार १०० प्रमाणे ऊस दर दिला आहे.कांदा व इतर पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता ऊस पिक परवडणारे असल्याचा सल्ला दिला आहे.चालू वर्षी समाधानकारक पाऊस झालेला असून भूजल पातळी टिकून आहे व सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे आवर्तन देखील समाधानकारक मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवडी कराव्यात असे आवाहन केले आहे.ऊस उत्पादकांच्या ऑनलाईन नोंदी घेण्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.शेतक-यांची वैयक्तीक ऊस नोंद,उसाचे टनेज,ऊस बिलाची माहिती,उचल केलेल्या साखरेचा तपशिल इत्यादी माहिती एपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार असून कारखान्याचा कारभार जास्तीत जास्त पेपरलेस कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे.वर्तमान काळ हा ए.आय.चे युग आहे.ए.आय.च्या माध्यमातून हवामान केद्र,सोलर, ड्रीप सिस्टीम,सेन्सर आदी गोष्टीचा उपयोग करून मातीत कोणत्या गोष्टीची कमतरता आहे याची अचूक माहिती मिळते.ड्रीपमधून योग्य खतमात्रा देवून व जीमिनीत कोणत्या भागात ओलावा कमी आहे त्या ठिकाणी ओल वाढविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी खर्चात,कमी क्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावा आगामी काळात कारखाना उपपदार्थ निर्मिती करणार असल्याचे सूतोवाच आ.काळे यांनी शेवटी केले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर संचालक सूर्यभान कोळपे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.
————————————
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.