जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयात,’जागतिक फिजियोथेरपी दिन’ संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फिजिओथेरपी महाविद्यालयात नुकताच जागतिक फिजियोथेरपी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

या वर्षीची थीम हेल्दी एजिंग” असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये शारीरिक सक्रियता वाढवणे,पडण्यापासून बचाव करणे,व दर्जेदार जीवनशैली टिकवणे यात फिजिओ थेरपिस्टची महत्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.

    सन -१९९६ मध्ये ०८ सप्टेंबर हा दिवस जागतिक पीटी दिन म्हणून घोषित करण्यात आला.१९५१ मध्ये जागतिक फिजिओथेरपीची स्थापना ही तारीख आहे.हा दिवस जागतिक फिजिओथेरपी समुदायाची एकता आणि एकता दर्शवितो.त्यामुळे हा दिवस जागतिक फिजिओथेरपी दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो तो कोपरगाव, कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फिजिओथेरपी महाविद्यालयात मोठया उत्साहात संपन्न झाला आहे.

  या कार्यक्रमास कार्यक्रमाचे उद्घाटन आरजेएस फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव काकडे,सचिव प्रसाद कातकडे,व्यवस्थापकीय संचालक प्रणित कातकडे,उद्योजक विजय कडू,दिपक कोटमे,प्राचार्य डॉ.गंगाधरन व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

   यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण उपक्रमाने झाली.त्यानंतर स्पर्धा रिल्स,फिजियो टॅक अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञान व सर्जनशीलतेचे दर्शन घडवले.तसेच रॅप वॉकद्वारे पॅथॉलॉजिकल गेट पॅटर्न व विकृतीचे प्रात्यक्षिक प्रेक्षकांना प्रेरणादायी ठरले आहे.

  सन-२०१९ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयात साडेचार वर्षाचा बी.पी.टी. ( बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ) अभ्यासक्रम चालतो तसेच २०२४ पासून एम. पीं.टी. ( मास्टर ऑफ फिजोथेरपी ) पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रारंभ केला आहे.

  या वर्षीची थीम हेल्दी एजिंग” असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये शारीरिक सक्रियता वाढवणे,पडण्यापासून बचाव करणे,व दर्जेदार जीवनशैली टिकवणे यात फिजिओ थेरपिस्टची महत्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.

दरम्यान यावेळी कम्युनिटी फिजिओथेरपी विभागातर्फे दिनांक ३ सप्टेंबर ३०२५ रोजी सडे गावात मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचा लाभ अनेक ज्येष्ठ नागरिकांना झाला.तसेच फिजीओथेरपी विषयी जनजागृती करण्यात आली.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ.गंगाधरण म्हणाले की,’ हेल्दी एजिंग ही आरोग्य सेवेची एक महत्त्वाची गरज आहे.यामुळे जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून बचाव होतो व वृद्धांना स्वावलंबी जीवन जगता येत असल्याचे शेवटी सांगितले आहे.यावेळी विविध स्पर्धांचे विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close