शैक्षणिक
परदेशी भाषा शिकण्याची… या महाविद्यालयात संधी!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
“आजच्या जागतिकीकरणाच्या युगात ‘ग्लोबल व्हिलेज’ ची संकल्पना साकार होत असताना देश-विदेशातील नवनवीन भाषा शिकणे युवा पिढीसाठी गरजेचे झाले असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आज भाषा ह्या दैनंदिन कामकाज किंवा फक्त संवादापुरत्या मर्यादित असून चालणार नाही,तर विविध भाषांमधील ज्ञान आत्मसात करण्यासाठी तरुणांनी वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व मिळविले पाहिजे”- डॉ.अशोक महाजन.
आधुनिक युगात भाषेचे महत्व अनमोल आहे, कारण ती विचार,भावना आणि संस्कृती व्यक्त करण्याचे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. भाषा लोकांना एकत्र जोडते,सामाजिक जीवन सुलभ करते आणि मानवी प्रगतीचा आधार आहे.माहिती तंत्रज्ञानामुळे भाषेचा प्रसार आणि वापर अधिक व्यापक झाला असून,ती जागतिक स्तरावर लोकांना जोडण्याचे तसेच सांस्कृतिक ओळखीचे आणि शैक्षणिक समृद्धीचे प्रतीक बनली आहे.त्यातच भारताची ओळख आता वैश्विक बनत असल्याने विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर विविध भाषा आत्मसात करणे गरजचे बनले आहे.हि गरज ओळखून कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाने या बाबत विद्यार्थ्यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘भाषा,वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुला’ सोबत सामंजस्य करारा अंतर्गत फ्रेंच व स्पॅनिश या भाषा शिक्षणाची व्यवस्था सुविधा उपलब्ध केली आहे.त्याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर,प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन,प्र-कुल सचिव प्रा.डी.डी.पवार भाषा संकुलाचे संचालक डॉ.दिलीप चव्हाण व डॉ.शंकरैया कोंडा आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”
आज भाषा ह्या दैनंदिन कामकाज किंवा फक्त संवादापुरत्या मर्यादित असून चालणार नाही, तर विविध भाषांमधील ज्ञान आत्मसात करण्यासाठी तरुणांनी वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व मिळविले पाहिजे.कोपरगाव सारख्या ग्रामीण परिसरातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून येथील के.जे. सोमैया महाविद्यालयाने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुला’ सोबत सामंजस्य करारा अंतर्गत फ्रेंच व स्पॅनिश या भाषा शिक्षणाची व्यवस्था सुविधा उपलब्ध केली आहे.
या सामंजस्य करारा अंतर्गत केवळ महाविद्यालयातीलच नव्हे तर बारावी उत्तीर्ण असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी फ्रेंच व स्पॅनिश भाषा शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.विजय ठाणगे यांनी या कराराला नांदेड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत मूर्त रूप दिले.
या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी सोमैया महाविद्यालयातील इंग्रजी विभागात प्रा. वर्षा आहेर (9975944807) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर नाविन्यपूर्ण उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.