गुन्हे विषयक
लग्नाच्या वरातीत राडा,०५ जणांवर हल्ला,नऊ जणांवर गुन्हा

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येस असलेल्या सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत काल ०९.२६ सुमारास लग्नाची वरात सुरू असताना तेथील असह्य असणाऱ्या डी.जे.च्या कर्णकर्कश आवाजाला हरकत घेऊन तो उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रतिबंध असल्याने तो बंद करण्याची मागणी केली असता आरोपी अमोल अशोक गुडघेसह ०९ जणांनी आपल्यासह पत्नी,मुलगा,भाऊ,पुतण्या आदींना लोखंडी रॉड,काठी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन आपल्या खिशातील ४५ हजार रुपये काढून घेतले असल्याचा गुन्हा पोलिस पाटील दगु मोहन गुडघे (वय-५५) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केल्याने सोनेवाडी आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोनेवाडी येथील पोलिस पाटील दगु मोहन गुडघे यांनी न्यायालयाचे प्रतिबंध असल्याची आठवण करून दिल्याचा राग व हरकत घेतल्याचा मोठा राग येऊन तेथील आरोपी अमोल अशोक गुडघे,किरण शांताराम गुडघे,अशोक चंद्रभान गुडघे,सागरजालींदर गव्हाणे,सोमनाथ जालींदर गव्हाणे,विजय चंद्रभान गुडघेगणेश ऊर्फ भाऊसाहेब गुडघे,
गोरख बाळासाहेब गव्हाणे,संगीता अशोक गुडघे सर्व रा.सोनेवाडी आदींनी पोलिस पाटील दगु गुडघे यांचेसह ०५ जणांवर हल्ला चढवला होता.
राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे.मात्र,गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय कायम ठेवला आहे.गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण मुंबईसह राज्यात डीजेवर बंदी असणार आहे.जर कुणी डीजेचा वापर केला तर पोलीस कारवाई करणार आहे.न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहे.परिणामी बऱ्याच गणेशोत्सव मंडळांनी डीजेला पर्याय म्हणून ढोल-ताशा पथक,लाईव्ह बँड किंवा कमी आवाजाच्या पारंपरिक वाद्य आणि साऊंड सिस्टीमचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.मात्र,तरीही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे.यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेले आहे.डीजेचा मोठा आवाज मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा मुद्दा पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा न्यायालयासमोर मांडला आहे.यामुळे ही बंदी कायम ठेवण्यात आली आहे.मात्र या नियमाचे पालन उत्साही मंडळी करतीलच असे नाही.परिणामी त्यातून अनेक कलह निर्माण होत आहे.अशीच घटनाकोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत काल रात्री घडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील सर्वच पोलीस पाटलांना डिजे बंदीचे आदेश पोलिसांनी दिलेले असल्याने त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी गावातील पोलिस पाटलावर येऊन पडली आहे.त्या बाबत काल रात्री ०९.२६ वाजता सोनेवडी गावात डीजेच्या तालावर एक वरात सुरू असताना त्या आवाजाने आभाळ फाटत असताना त्याला तेथील पोलिस पाटील दगु मोहन गुडघे यांनी न्यायालयाचे प्रतिबंध असल्याची आठवण करून दिल्याचा राग व हरकत घेतल्याचा मोठा राग येऊन तेथील आरोपी अमोल अशोक गुडघे,किरण शांताराम गुडघे,अशोक चंद्रभान गुडघे,सागरजालींदर गव्हाणे,सोमनाथ जालींदर गव्हाणे,विजय चंद्रभान गुडघेगणेश ऊर्फ भाऊसाहेब गुडघे,
गोरख बाळासाहेब गव्हाणे,संगीता अशोक गुडघे सर्व रा.सोनेवाडी आदींनी पोलिस पाटील दगु गुडघे त्यांची पत्नी वंदना गुडघे,भाऊ संजय गुडघे,मुलगा नवनाथ गुडघे,पुतण्या निलेश गुडघे आदींना लोखंडी रॉड,काठी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी दगु गुडघे यांच्या खिशातील ४५ हजार रुपये काढून घेतले असल्याचा गुन्हा पोलिस पाटील दगु मोहन गुडघे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केल्याने सोनेवाडी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुंदरडे यांनी भेट दिली आहे.या घटनेने पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात गुन्हा अनुक्रमे नोंद २५२ /२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३२,११९,११८(१)११५(२),३५२,३५१(१),१८९(२),१९१(२),१९१(३),१९० प्रमाणे आरोपीविरुद्ध नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मशाळा सुंदरडे हे करीत आहेत.