गुन्हे विषयक
नोटा मोजण्यासाठी अनेक यंत्रे,वाहून नेण्यासाठी अनेक गाड्या,गुप्तचर विभागाची कारवाई !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
मूळ कोळगाव येथील व वर्तमानात नाशिकरोड परिसरातील रहिवासी असलेल्या एका सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या घरावर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यानंतर त्याने ऑनलाइन गेमिंग ॲप पद्वारे कर चुकवत मोठी कमाई सुरू केली होती.संबंधित इंजिनिअरविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलीस तपास सुरू आहे.यातील जप्त सुमारे ०७ कोटींच्या नोटा मोजण्यासाठी बँकातून अनेक यंत्रे आणावी लागली असून त्या वाहून नेण्यासाठी दोन गाड्या आणाव्या लागल्या असल्याने कोपरगाव,नाशिकरोड,पुणे परिसरात या जीएसटी गुप्तचर विभागाच्या कारवाईची मोठी चर्चा होत आहे.

दरम्यान या पथकांकडून ०२ इंजिनिअर्स ०४ पथकाकडून ०३ ठिकाणी ०७ तास चौकशी केल्याची माहिती आहे.संशयिताच्या घरातून पथकाने तब्बल दोन ट्रंक भरून रोख नोटा जप्त केल्या आहेत.ती सुमारे ०७ कोटी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यानंतर त्याने ऑनलाइन गेमिंग ॲपद्वारे कर चुकवत कमाई सुरू केली होती.
सायबर क्राईमच्या अनेक घटना आपल्या कानावर सातत्याने पडत आहेत.त्यामुळे केवळ आर्थिकच नाही तर मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागत असल्यामुळं सायबर क्राईम ही गंभीर समस्या ठरत आहे.यात भारतभरात सुमारे ०६ लाख कोटींची तर जगभरात वार्षिक ६० लाख कोटींची धक्कादायक उलाढाल होत असल्याची माहिती आहे.सरकार या अशा खेळावर १० टक्के कर आकारात असते.मात्र तोही या कंपन्या देण्यास टाळाटाळ करत असतात.याशिवाय सत्ताधारी गटाला खुश करण्यासाठी या कंपन्या निवडणूक काळात कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन आपल्याकडे कानाडोळा करण्यास भाग पाडत असतात.त्यामुळे त्यांना सरकारचा धाक वाटेनासा होतो आणि ते जेमतेम असलेला १० टक्के टॅक्स वाचवण्याचे धाडस करताना दिसत असून त्यातून ते कोट्यवधी रुपयांची माया गोळा करत असतात.अशीच घटना काल पुणे,नाशिक येथे कार्यरत असलेल्या कंपनीबाबत घडली असून पुणे येथील डायरेक्टोरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे झोनल युनिटच्या पथकाने शनिवारी दिनाक २६ जुलै रोजी सकाळी ही कारवाई केली आहे.जॉईंट छाप्यात गावठी कट्टा,सहा जिवंत काडतुसे,सुमारे ०७ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.(त्यासाठी या पथकाला कोपरगाव बेट येथे आरोपीच्या घरातील नोटा मोजण्याचे अनेक मशीन आणि रोख रक्कम भरण्यासाठी दोन गाड्या पाचारण कराव्या लागल्या आहेत.)त्यात मूळ कोपरगाव येथील तरुण मात्र सुराणा हॉस्पिटल चौकात कपालेश्वर बिल्डिंगमध्ये फ्लॅट क्रमांक १०४ मध्ये रहिवासी असलेला श्रीकांत प्रल्हाद पर्हे याचे विरुद्ध नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.

याबाबत प्राथमिक माहितीनुसार,संबंधित सॉफ्टवेअर कंपनीकडून विविध आयटी सेवा पुरवण्याचा बनावट इन्व्हॉइस तयार करण्यात आले आहे. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा जी.एस.टी. चोरी केल्याचा संशय आहे.या पार्श्वभूमीवर कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची,दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार,संबंधित सॉफ्टवेअर कंपनीकडून विविध आयटी सेवा पुरवण्याचा बनावट इन्व्हॉइस तयार करण्यात आले आहे. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा जी.एस.टी. चोरी केल्याचा संशय आहे.या पार्श्वभूमीवर कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची,दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली.या छाप्यात कंपनीचे संगणक,सर्व्हर,हार्डडिस्क,पेनड्राइव्ह आणि आर्थिक कागदपत्रे जप्त करण्यात आली. संबंधित सॉफ्टवेअर डेव्हलपरची चौकशी सुरू असून अजून अधिकृतरित्या माहिती देण्यात आली नाही.छापेमारी दरम्यान पथकाला पर्हे यांच्या ताब्यातून गावठी रिव्हॉल्व्हर आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली आहे हे विशेष!.
यासंदर्भात जी.एस.टी.विभागाचे अधीक्षक मनोज ईश्वर चौधरी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे करत आहेत.गावठी रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
दरम्यान डायरेक्टर अभय फाळके आणि सीनियर इंटेलिजन्स ऑफिसर वेणू रेड्डी यांच्या पथकाने आर्टिलरी सेंटर रोडवरील सुराणा चौकातील कपालेश्वर बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक १०४ मध्ये राहणाऱ्या श्रीकांत प्रसाद पर्हे (वय-२७) यांच्या निवासस्थानी छापा टाकला आहे.त्यामुळे नाशिक,पुणे, कोपरगाव आदी परिसरात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात जी.एस.टी.विभागाचे अधीक्षक मनोज ईश्वर चौधरी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.मात्र याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलिसांना विचारणा केली असता त्यांना कोणतीही खबर नसल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान या पथकांकडून ०२ इंजिनिअर्स ०४ पथकाकडून ०३ ठिकाणी ०७ तास चौकशी केल्याची माहिती आहे.संशयिताच्या घरातून पथकाने तब्बल दोन ट्रंक भरून रोख नोटा जप्त केल्या आहेत.ती सुमारे ०७ कोटी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यानंतर त्याने ऑनलाइन गेमिंग ॲपद्वारे कर चुकवत कमाई सुरू केली होती.