गुन्हे विषयक
…या शहरात सायबर क्राइमची मोठी धाड,कोटींचा ऐवज जप्त ?

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात आज दुपारपासून पुणे येथील सायबर क्राइम विभागाची धाड पडली असून यात कोपरगाव बेट येथील पर्हे नामक एक तरुण अवैधरित्या ऑनलाईन गेम चालवून कोट्यवधीची माया गोळा केल्याचा त्या विभागाचा संशय आणून त्यांनी घटनास्थळी जप्त मोठ्या रकमेसाठी शहरातील विविध बँकाकडून मशीन गोळा केल्या असून ही धाड कोपरगावच्या इतिहासात सर्वात मोठी समजली जात आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान याच धाडीच्या वेळी शहरातील सुभाषनगर या ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री प्रकरणी धाड टाकली असून त्या ठिकाणी मोठा ऐवज सापडला असल्याची शहरात ४९ हजारांची मोठी चर्चा असून त्यास पोलिस सुत्रांनी दुजोरा दिला असून आरोपी अन्वर गुलाम पठाण (वय – ३४) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणं मोठ्या प्रमाणावर वाढलीआहेत.ओ.टी.पी.फसवणूक,बनावट जॉब ऑफर्स,लिंकद्वारे पैसे काढून घेणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नागरिक आपली मेहनतीची कमाई गमावतात.मात्र,अनेकदा फसवणूक झाल्यानंतर लोक गोंधळून जातात आणि वेळेवर तक्रार करत नाहीत.वर्तमान काळात या ऑनलाईन आणि सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत.ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या येत आहेत.सायबर गुन्हेगार स्वत:ला सरकारी अधिकारी,न्यायाधीश बनवून लोकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन लाखो रुपये ऑनलाईन हडप करतात.सुशिक्षित लोकही डिजिटल पद्धतीने सायबर फसवणुकीला बळी पडत असल्याचे दिसून आले आहे.अशा प्रकरणांमध्ये तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.ही तक्रार ऑनलाईन दाखल करता येणार आहे.मात्र बऱ्याच जणांना याबाबत माहिती नसल्याने अनेकजण या जाळ्यात फसत आहे.तर काही ऑनलाइन अवैध जुगार अड्डे चालवून अनेकाना फशी पाडून आपले उखळ पांढरे करत आहेत.अशाच एका घटनेतील कोपरगाव नजीक आलेल्या कोपरगाव बेट येथील एक पर्हे नामक अल्पशिक्षित तरुण (अंदाजे २० वर्षीय वय ) आरोपीवर पुणे येथील सायबर क्राइम शाखेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली असल्याचे दिसून आले आहे.

यातील संशयित तरुणाने अलीकडील काळात आकस्मिक रीत्या मोठी माया गोळा केली असून अनेकांचे डोळे विस्फारून जाण्याची वेळ आली आहे.त्यात त्यांचेकडे अनेक उंची व आलिशान चारचाकी गाड्या,जमिनजुमल्याची एकराची खरेदी असे बरेच काही समाविष्ट असून गट पंधरवड्यात त्याने छत्रपती संभाजी चौकात असलेल्या मंगल कार्यालयात आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त जवळपास २०-२५ लाख रुपये उधळले असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.
या धाडीत रक्कम इतकी मोठी आहे की तिची मोजदाद करण्यासाठी पोलिसांना कोपरगाव शहरातील विविध सरकारी आणि सहकारी बँकाचे पैसे मोजण्याचे यंत्र गोळा करावे लागले आहे.
यातील संशयित तरुणाने अलीकडील काळात आकस्मिक रीत्या मोठी माया गोळा केली असून अनेकांचे डोळे विस्फारून जाण्याची वेळ आली आहे.त्यात त्यांचेकडे अनेक उंची व आलिशान चारचाकी गाड्या,जमिनजुमल्याची एकराची खरेदी असे बरेच काही समाविष्ट असून गट पंधरवड्यात त्याने छत्रपती संभाजी चौकात असलेल्या मंगल कार्यालयात आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त जवळपास २०-२५ लाख रुपये उधळले असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव पोलिस अधिकाऱ्यास संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही मात्र एका पोलिसी सूत्राने त्यास दुजोरा दिला आहे.व याबाबत कारवाई सुरू असल्याच्या बातमीस दुजोरा दिला आहे.उपविभागीय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी
संपर्क साधला असता त्यांना या धाडीची कोणतीही खबर नसल्याचे दिसून आले आहे.मात्र विविध बँकांशी संपर्क साधला असता त्यांनी नोटा मोजण्याचे संयंत्र नेल्याची कबुली दिली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान याच धाडीच्या वेळी शहरातील सुभाषनगर या ठिकाणी कोपरगाव शहर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री प्रकरणी धाड टाकली असून त्या ठिकाणी मोठा ऐवज सापडला असल्याची शहरात मोठी चर्चा असून त्यास वरिष्ठ पोलिस सुत्रांनी दुजोरा दिला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान पुणे येथील सायबर क्राइम विभागाने या अवैध सट्ट्या प्रकरणी या गुन्ह्याशी संबंधित सर्व आरोपींवर एकाच वेळी धाडी टाकल्याची माहिती मिळत आहे मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.